रामटेक :- राजु कापसे
कायदा हाती घेतील, अशीही भीती आता सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. करवाही, झिंझरीया महाराजपूर, नवेगाव, खनोरा, आदी गावातील इसमाना पट्टेदार वाघाने ठार केले. यावेळी संतप्त गावकरी संतप्त झालेले आहे.
वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवर जलद कारवाई करुन वाघांना पकडण्याकरिता कारवाई करावी,या वाघाना अन्यत्र स्थानांतरीत करावी नरभक्षी वाघांना त्वरित पकडा पारशिवनी, देवलापार , रामटेक तालुक्यातील गावांमध्ये वाघांनी धुमाकूळ घातला आहे. नरभक्षी वाघाने अनेकांना ठार केले, काहींवर प्राणघातक हल्ले करुन गंभीर जखमी केले.
यामुळे सर्व नागरिकांच्या मनात रोष वाढला आहे. या स्थितीत त्या सर्व वाघांना त्वरित पकडा अशी पारशिवनीत, देवलापार येथे वाघांना पकडा याकरिता रास्ता रोको आंदोलन झाले आहे. पण तरीही वन विभागाकडून काहीही कारवाई झालेली नाही.फक्त आतापर्यत एकच वाघ पकडण्यात आलेला आहे.
झिंझरिया येथेविभागातील कर्मचाऱ्यांवर तुफान दगडफेक केली होती,आता जमुनिया येथे गाडीची तोडफोड केली.. पुढे असाच प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अवस्थेत तातडीने नरभक्षी वाघांना पकडणे गरजेचे झाले आहे. घटनास्थळी डी.ओ.फो.प्रभूनाथ शुक्ला, वनविभागाचे सर्व अधिकारी, वनकर्मचारी उपस्थित होते.