चंद्रपूर(नरेंद्र सोनारकर)
भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरानीं 14 ऑकटोंबर 1950 साली बौद्ध धम्माची दिक्षा घेतली व आपल्या लाखो बौद्ध बांधवांना बौद्ध धम्माची दिक्षा देऊन जनावरां पेक्षाही हीन वागणूक मिळत असलेल्या महार समुदायला माणुसपण बहाल केले…त्यानंतर मोठी समाजिक क्रांती झाली.शैक्षणिक क्षेत्रात तर बौद्धांनी चमत्कारिक यश संपादन केले.आणी बाबासाहेबांचा सन्मान म्हणून अनेक पालकांनी आपल्या पाल्यांच्या शालेय टीसी वर महार या जातीच्या ठिकाणी ‘बौद्ध’ म्हणून नमूद केले…
अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी 1950 च्या पुराव्यांची अट असल्याने टीसी वर जरी बौद्ध नमूद असले तरी पुरावे हे महार जातीचेच जोडल्या जात असल्याने जात प्रमाणपत्र हे महार जातीचेच बनले.जात वैध्यता प्रमाणपत्रही महार म्हणूनच देण्यात आले.बौद्ध आणी नवबौद्ध हे अनुसूचित जातीत 37 नंबर वर येत असल्याचे महाराष्ट्र आणी केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश असतांन्ही टीसी वर बौद्ध आणी जात प्रमाणपत्र तथा जात वैद्यता प्रमाणपत्र महार असल्याच्या सबाबी खाली प्रदेश नियमन प्राधिकरण समिती मुंबईच्या अध्यक्ष आणी सचिवाने टीसी वर बौद्ध नमूद आहे म्हणून डॉ.सौ.वसुधा झाडे नर्सिंग कॉलेज चंद्रपूरच्या कु.श्रेया नवशत्रू तांबेकर या विध्यार्थिनीचा प्रवेश नकारण्याचे पत्र महाविद्यालयाला दिले आहे.या पत्रा मुळे एकच खळबळ उडाली असून,जात प्रमाणपत्र ,जात वैधता प्रमाणपत्र असूनही टीसी वर बौद्ध असणाऱ्या विद्यार्थ्यी आणी पालकांना थरकाप सुटला आहे.राज्यात टीसी वर बौद्ध नमूद असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लखोंच्या घरात असून,या समितीला जात प्रमाणपत्र,जात वैधता प्रमाणपत्र महत्वाचे नसून टीसी वरील बौद्ध नमूद असलेले खटकत आहे काय?असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान महारांनी बौद्ध धम्म घेतला कशाला?त्यांनी त्यांच्या टीसी मध्ये बौद्ध नमूद का केले?बौद्धांना शैक्षणिक आरक्षण कशाला?असले वाह्यात प्रश्न समितीच्या अध्यक्ष व सचिवाला निर्माण झाल्यामुळेच जात वैधता प्रमाणपत्र आणी जातीच्या प्रमाणपत्राची दखल न घेता ही समिती टीसी वर बौद्ध नमूद आहे म्हणून जातीयवादी कृतीतून ही कार्यवाही करीत असल्याचे पीडित विद्यार्थिनीच्या पालकांचे म्हणणे आहे.