Saturday, September 21, 2024
Homeराज्यमिरजेतील रस्ते त्वरित दुरुस्त झाले नाहीत तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवू... ओंकार शुक्ला

मिरजेतील रस्ते त्वरित दुरुस्त झाले नाहीत तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात बसवू… ओंकार शुक्ला

सांगली – ज्योती मोरे

मिरजेतील नागरिक रस्त्यांच्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासन बदललं अधिकारी बदलले तरी मिरजेचे रस्ते चांगले होण्या ऐवजी जास्तच खराब होत चालले आहेत. याबाबत लोक अभियानाच्या वतीने अभिनव आंदोलन करत शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या खड्ड्यांचे फोटो काढून त्याचे प्रदर्शन महानगरपालिकेच्या आवारात भरवण्यात आले.

मिरज शहरात मार्केट परिसर, गाढवे चौक, पोलीस स्टेशन, सराफ कट्टा, मंगळवार पेठ किल्ला भाग, ब्राह्मणपुरी, वखारभाग, नदीवेस, पाटील गल्ली, सोमवार पेठ, कमान वेस, वाळवे गल्ली, विजापूर वेस, दिंडी वेस येथील फोटो काढून महानगरपालिकेच्या पोर्च मध्ये, गेटवर, दरवाजावर, हे फोटो चिटकवण्यात आले.

लोक अभियनाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनात हे फोटो चिटकवण्यासाठी प्रवेश केला असता प्रशासनाने दरवाजे बंद करून त्यांचे आडवणुक केली असता कार्यकर्त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. महापालिकेचा निषेध यावेळी कार्यकर्त्यांनी केला.

लोक अभियानच्या वतीने तीन महिन्यापूर्वी स्वखर्चाने शहरातील खड्डे भरून घेतले होते. परंतु अजूनही रस्ते चांगले झाले नाहीत शहर सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली अमाप पैसा खर्च होत आहे. परंतु यांना चांगले रस्ते करायला पैसा नाही. याचे नेमके काय कारण आहे हे समजत नाही.

महानगरपालिका प्रशासनाने शहरातील रस्ते त्वरित दुरुस्त न केल्यास अधिकारी नगरसेवकांच्या गाडी अडवून त्यांना खड्ड्यात बसवून फोटो काढले जातील आणि लोक अभियानाचा आंदोलनाचा जोर मोठा केला जाईल असा इशारा लोक अभियानाचे निमंत्रक ओमकार शुक्ल यांनी दिला.यावेळी लोक अभियानाचे निमंत्रण श्री ओमकार शुक्ल, श्री एडवोकेट सीजी कुलकर्णी, श्री निलेश साठे, श्री विजय राठी, श्री अनिल हंबर, सुरज डवरी महेश नाईक, अभिषेक म्हेत्रे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: