सांगली प्रतिनिधी :– ज्योती मोरे.
दिवाळी हा सण हिंदू धर्मियांचा आत्मीयतेचा विषय असून या सणासाठी निरनिराळे स्टॉल गोरगरीब मारुती रोड व आजूबाजू येथील इतर परिसरात स्टॉल लावून आपल्या पोटाची खळगी व दिवाळी सारख्या सणा निमित्त जणू काय बोनस्वरूपी उत्पन्न मिळवून आपल्या कुटुंबाचा उदय निर्वाह करतात. परंतु एका इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीला मॅनेज होऊन एकेरी भूमिका घेत कोणत्याही सामाजिक, राजकीय व रस्त्यावरील फेरीवाले दुकानदार यांच्याशी समन्वय न साधता सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आज या लोकांची दिवाळी अत्यंत अडचणीत आली असून अनेकांचे भले मोठे नुकसान यामध्ये झाले आहे.
मी स्वतः व संबंधित सर्व दुकानदार फटाके स्टॉल धारक यांना घेवून साहेबांना ऑफिसला जाऊन अनेक वेळा भेटून विनंती केली, परंतु आपल्या पदाचा गैरवापर करत या ठिकाणी या सर्वांचं भलं मोठं नुकसान करण्यात आले आहे. खरं तर आम्ही पावसा संबंधित व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर पाऊस पडल्यानंतर होणारे वास्तविक परिस्थिती सांगितली असता आम्हाला आयुक्तांनी सांगितलं की आम्ही हवामान खात्याचा पूर्ण अंदाजपत्रक घेतला आहे. कोणत्याही प्रकारचा पाऊस या ठिकाणी होणार नाही मी म्हणालो “साहेब जर का पाऊस झाला तर या लोकांचं होणारा नुकसान भरपाई तुम्ही देणार का” त्यावर साहेब म्हणाले पाऊस तर येणारच नाही आणि जर का असं काही झालं तर आम्ही नुकसान भरपाई देऊ.
आज मला आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे यांच्या चुकीच्या निर्णयामुळे झालेल्या नुकसानाची जबाबदारी स्वीकारून महापालिकेने या सर्व लोकांचं नुकसान भरपाई देऊन त्यांना न्याय द्यावा अन्यथा या सर्व विषयासंबंधित माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांना वस्तुस्थिती सांगून आपणावर कारवाई करण्याची मागणी करू.