मूर्तिजापूर प्रतिनिधी
अकोला जिल्हा हा जातीयवादी जिल्हा म्हणून ओळख असली तरी ती ओळख पुसण्याची संधी यावेळी अकोल्या जिल्ह्यातील जनतेवर आहे. कारण जातीपातीच्या राजकारणामुळे जिल्ह्यातील जनतेच फार मोठ नुकसान झालंय. शेजारी जिल्हा अमरावती दिवसेंदिवस प्रगतीकडे चालला मात्र अकोला जैसेथे, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एका बलाढ्य पैसेवाल्या उमेदवाराला एका बौद्ध समाजातील एका सामान्य माणसाने हरविले, त्यामुळे अकोला जिल्यातील जनता आता तरी आपल्या शेजारील जिल्ह्याचा बोध घेणार का?. राज्याच्या ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. अश्यातच मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघ हा एस.सी. राखीव असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडे अनेक बौद्ध समाजच्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे. या मध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोगरदिवे प्रा. काबळे सर,आनंद उर्फ पिंटू वानखडे, ऍड शेखर आप्पाराव वाकोडे रा.मंगरुड कांबे तालुका मूर्तिजापूर यांच्या सह अनेक अनुसूचित जातीच्या उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे जर बौद्ध समाजाच्या/अनुसूचित जातीच्या उमेदवाराला जर उमेदवारी देण्यात आली तर मूर्तिजापूर विधानसभा मधला बौद्ध समाज/अनुसूचित जातीचे मतदार एक तर्फी समाजाच्या उमेदवाराला मदतदान करतील अशी चर्चा ग्रामीण भागात सुरु आहे..!
या मध्ये प्रामुख्याने सम्राट डोगरदिवे यांचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत असून सम्राट डोगरदिवे हे गेल्या 20 ते 25 वर्षा पासून शेतकऱ्यांकरिता व इतर नागरिकांकरिता आंदोलने व समाजसेवा करीत आहे त्यांचा अकोला, वाशीम जिल्ह्यामध्ये तसेच प्रामुख्याने मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघा मध्ये दांडगा संपर्क आहे. या अगोदर ते हातगाव जिल्हा परिषद चे सदस्य होते तर सध्या स्थितीत लाखपुरी जिल्हा परिषद मतदार संघांचे सदस्य आहे त्यांना मराठा मुस्लिम व इतर समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची चर्चा आहे.
रा. कॉ तर्फे बोद्ध समाज / अनुसूचित जातीतील उमेदवाराला उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा संपूर्ण मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघा मध्ये रंगु लागली आहे तसेच पक्षा तर्फे उमेदवारी मागणार्यापैकी कुठल्याही एका बौद्ध समाजच्या उमेदवाराला उमेदवारी मिळाल्यास सर्वे मिळून काम करू अशी सुद्धा मतदार संघा मध्ये चर्चा आहे तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीमध्ये प्रमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उभाठा) व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार तथा प्रहार यांचा सुशिक्षित उमेदवार म्हणून डॉ. अभय काशीनाथ पाटील यांनी निवडणूक लढवली या सर्व पक्षांची ताकद सोबत असताना सुद्धा या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवाराला मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातून 8147 मतांनी पिछाडी मिळाली होती.
तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघ हा निवडणुकीत आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता ह्या वर्षी आपण तो मतदार संघ सोडून वर्धा लोकसभा मतदारसंघ घेतला व अमरावती मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखडे बौद्ध उमेदवार देत निवडून आणले त्यामुळे अकोला जिल्ह्यातील ही बौद्ध मतदार हा परिवर्तनाच्या वाटेवर असल्याचे सध्या दिसत आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून जर बौद्ध समाजाला उमेदवारी मिळाली तर दोन महिने आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ही 8147 मतांची पिछाडी मिळाली होती, ती बौद्ध उमेदवार या ठिकाणी भरून काढू शकतो ही चर्चा सध्या संपूर्ण मतदारसंघात आहे. पक्ष प्रमुख काय निर्णय घेतील या कडे सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे..