१५ व्या वित्त आयोगाच्या निधीत घोळ, मर्जीनुसार काम केल्याचा आरोप…
एकोडी – महेंद्र कनोजे
वडेगाव येथील ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामसेवक यांनी इतर सदस्यांना विश्वासात न घेता १५व्या वित्त आयोगाच्या रकमेची अफरातफर केल्याचा आरोप केला आहे. विविध साहित्य निधी खर्च केल्याचे सांगण्यात येत असले तरी खरेदी केलेले साहित्य कुठे लावण्यात आले नसल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अन्यथा ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याचा इशारा माजी उपसरपंच शिबिरकुमार चोले यांनी दिला आहे.
वडेगाव येथील सरपंच व ग्रामसेवक जयंत तिडके यांनी आपल्या मनमर्जीनुसार सामान्य फंड व १५व्या वित्त आयोगाचा निधी पदाधिकारी व सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर.
चौकशी समिती येणार ७ तारखेला
वडेगाव ग्रामपंचायतमध्ये झालेल्या निधीच्या अफरातफर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिरोडा पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी यांनी वरिष्ठांच्या निर्देशा- नुसार चौकशी समिती गठित केली आहे. ही चौकशी समिती ७ जून रोजी वडेगाव ग्रामपंचायत येथे चौकशीसाठी येणार असून, सर्व
पदाधिकारी, सदस्य व तक्रारकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे पत्र खंडविकास अधिकाऱ्यांनी ३ जून रोजी दिले आहे.
विल्हेवाट लावल्याचा आरोप चोले यांनी केला आहे.
या निधीअंतर्गत घंटगाडी, खुर्ची, कॉम्प्युटर, आरओ, प्रिंटर, ब्लॅकबोर्ड, कचरा अॅम्लिफायर, पेट्या, हॅलोजनबल, अंगणवाडी विद्यार्थ्यांसाठी गणवेश तसेच इतर
साहित्य खरेदी करण्यात आले. यावर १३ लाख रुपयांचा निधी खर्च झाला आहे. मात्र हे साहित्य गेले कुठे अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वडेगाव ग्रामपंचायतीत १३ सदस्य आहेत. परंतु सरपंच कुणालाही विश्वासात न घेता सचिवाच्या मदतीन
शासकीय निधी मनमर्