Friday, November 22, 2024
Homeराजकीयआमदार हरीश पिंपळे यांचं भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही तर मग...

आमदार हरीश पिंपळे यांचं भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही तर मग…

काल भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. पण तरीही काही जागांवरचा सस्पेन्स अखेर कायम राहिला आहे. भाजपच्या मुर्तीजापुर विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांच्या विरोधकांनी काल जल्लोष साजरा केला तर दुसरीकडे हरीश पिंपळे यांच्या गटात शोककळा पसरली होती. विशेष म्हणजे भाजपची उमेदवारी जाहीर होण्याआधीच या आमदारांचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र अजूनही दुसरी यादीत नाव येण्याची आशा हरीश पिंपळे यांना आहे.

हरियाणाच्या निकालानंतर भाजपने आता राज्यातही संघाची साथ घेणे कबूल केले असून संघाने आपला पुढाकार घेऊन त्यांच्या यादीप्रमाणेच तर भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. उमेदवारी लिस्ट जाहीर होण्यापूर्वी संघाने अकोला वर वाशिम या दोन्ही जिल्ह्यातील आठही विधानसभेत फक्त रणधीर सावरकर यांची जागा सुरक्षित असल्याचे भाकीत केले होते. त्याचप्रमाणे तसा सर्वेही संघाकडून देण्यात आला होता. तर पहिल्याच यादीत अकोट, मूर्तिजापूर, बाळापुर, अकोला पश्चिम या ठिकाणच्या उमेदवारांनी नाव न आल्याने आता या ठिकाणी नवीन चेहरा देणार असल्याचे समजते, जो महाविकास आघाडीला तगडी फाईट देणार आणि निवडून येणार अशाच उमेदवारांना तिकीट मिळणार आहे. म्हणूनच पहिल्या यादी या मतदारसंघातील नाव वगळण्यात आली आहेत. तर राज्यात भाजपने अनेक ठिकाणी जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मात्र अकोला जिल्ह्यातील काही आमदारांना वगळल्याने त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचे आता दिसत आहे.

दुसरीकडे मूर्तिजापूर मतदारसंघात विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळणार असल्याचे समजत होते. मात्र कालच्या यादीमध्ये नाव न आल्यामुळे त्यांचा हिरेमोड झाला. मिळालेल्या माहितीनुसार पिंपळे यांनी बॅनर, झेंडे, पोस्टरही तयार करण्यात आले होते. तर काही ठिकाणी लागणाऱ्या परवानग्यासाठीही तहसील कार्यालयात चकरा सुरू होत्या. मात्र कालच्या यादीमध्ये नाव न आल्याने विद्यमान आमदारावर बॅनर पोस्टर आता दुसऱ्याला देण्याची वेळ आली आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपची जागा सुरक्षित नसल्यामुळेच त्यांना वगळण्यात आलं की काय असे प्रश्न उपस्थित होतो. एवढे मात्र नक्की की जोपर्यंत राष्ट्रवादी आणि वंचित या दोन पक्षाच्या उमेदवारांची घोषणा होत नाही तोपर्यंत भाजपच्या उमेदवाराची घोषणा होणे शक्य नाही. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वंचितचा कोणता चेहरा या मतदारसंघाला देणार त्यावरच भाजपचे भावी आमदार अवलंबून असणार आहेत, सोबतच राष्ट्रवादीच्या एका मोठ्या चेहऱ्याची जर घोषणा झाली तर येथे भाजप नवीन चेहरा देणार असल्याचे समजते तो भाजपचा उमेदवार नवीन चेहरा कोणीही असू शकते तर संघाने दिलेल्या यादीमध्ये जे तीन नाव आहेत. त्या तीन नावापैकी सर्वात एक नंबरचे जे नाव आहे ते आहे अकोल्याचे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांचं. इंगळे हे या विधानसभे त भाजपचा मोठा चेहरा असू शकतात. त्यांची प्रतिमा सर्व समाजाला घेऊन चालण्याचे असल्याने ते बाकी इतर कोणत्याही पक्षाला ते आरामात मात देऊ शकतात. मागील 2004 च्या निवडणुकीत त्यांना याच मतदारसंघात काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली होती, मात्र समोर राष्ट्रवादीचे त्यांचेच मित्र तुकाराम बिडकर असल्यामुळे त्यांना हार पत्करावी लागली. मात्र यावेळी भाजपकडे पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे काबीज करण्याची मोठी संधी आहे.

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघातील चार वेगवेगळ्या जिल्हा परिषद सर्कल मधून निवडून आलेत. त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कारकीर्द चांगली गाजलीच आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी नवखा नाही, ते सर्व समाजाला चालणारी नेते असल्याचे लोक सांगतात तर अशा तगड्या उमेदवाराला जर तिकीट दिले तर ते बाकीच्या दोन्ही पक्षांना कमजोर करून टाकण्याची ताकद श्रावण इंगळे यांच्यात आहे. तेवढा त्यांचा प्रशासकीय दरारा आहे. श्रावण इंगळे यांनी लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार अनुप धोत्रे यांना बरीच मदत केली त्यामुळेच अकोला पूर्व मधून अनुप धोत्रे यांना मोठा लीड मिळाला होता. संघाकडून त्यांचं नाव आघाडीवर असल्याचे समजते तर विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांना मात्र यावेळी डावलनार असल्याचे समजत आहे त्याचे कारणे बरेच असतील….

मतदारसंघ हा जातीवादी असल्याचा अनेकांनी ठपका लावला होता, या मतदारसंघात फक्त हिंदू दलित निवडून येतो असल्याचा भ्रम मतदारसंघातील काही भामट्या नेत्यांनी पसरविला होता, मात्र मागील 2019 च्या निवडणुकीत वंचितला भरभरून मते मिळाली तर ते मते फक्त बौद्धांचीच मते नव्हती तर इतरही समाजातील लोकांनी सुद्धा बौद्धांना मते दिली तर आता या मतदारांमध्ये बरेच बदल झाले आहेत तेव्हाच्या वेळेस जातीपातीचे राजकारण असू शकते मात्र यावेळी मतदारसंघाला विकास करणारा माणूस हवा आहे…

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: