चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार या वेळी शरदचंद्र पवार यांची तुतारी वाजवून विजयी डंका फुकणार असल्याची विश्वासनीय माहिती असून,यामुळे चंद्रपूर अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या चंद्रपूर निर्वाचन क्षेत्रातून काँग्रेस च्या वतीने आमदार होण्याचे स्वप्न बाळगून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या तब्बल 24 भावी आमदारांच्या तोंडचे पाणी पडाले आहे…
गेल्या निवडणुकीत काँग्रेस भाजपचा धुव्वा उडवत प्रचंड मताधिक्य घेत जोरगेवार अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले होते.दरम्यान त्यांनी चंद्रपूर निर्वाचन क्षेत्रासाठी 200 युनिट बिल माफ करू अशी घोषणा केली होती.
मात्र 5 वर्ष पूर्ण झाल्यावरही 200 युनिट मोफत ची घोषणा हवेतच विरली.ते सत्तेच्या बाजूने असूनही त्यांच्या मागणीला सत्ताधाऱ्यांनी कराची टोपली दाखवली.त्यामुळे जोरगेवार अडचणीत येऊन काँग्रेसचा उमेदवार भारी मताने निवडून येईल,हे गणित आखून अनेकांनी काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून दावेदारी केली.
उमेदवारी मिळणारच या आशेने अनेकांनी आपल्या प्रचारात आजवर बोर्ड,बॅनर,कार्यालये यासाठी लाखो रुपये खर्चही केले…पण ऐन् वेळेवर जोरगेवार यांनी शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी हे चिन्ह घेऊन लढण्याचा निर्णय घेतला,आणी उमेदवारीसाठी शर्यतिचे प्रयत्न चालविले आहेत.
त्यामुळे आघाडीच्या इच्छुक भावी आमदारात एकच खळबळ उडाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु झाले असून,वेळेचे नियोजन आखत जोरगेवार यांनी मारलेला सिक्सर अनेक उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरला आहे.
जोरगेवार यांना तुतारी फुंकायला मिळते की नाही?हे गुलदस्त्यात असले तरी,यामुळे काँग्रेस कडे उमेदवारी मागणाऱ्या 24 इच्छुकांचे गणित बिघडले आहे.