सांगली — ज्योती मोरे.
सांगली जिल्ह्यातील कॉफी शॉप मध्ये चालणाऱ्या गोष्टींबाबत श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान पोलिसांच्या मदतीने कारवाई करणार. त्यामुळे या कॉफी शॉप मालकांसह चालकांनी सुधारणा करावी, अशी प्रतिक्रिया श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील कॉफी शॉप मध्ये अश्लील चाळे,नशा,कंपार्टमेंटच्या माध्यमातून लॉज सारख्या सुविधा पुरवल्या जात असल्याचं आणि यामुळे अनेक किशोरवयीन तसंच तरुण मुला-मुलींचे आयुष्य खराब होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून या विरोधात आवाज उठवण्यात आला. नुकतच यासंदर्भात श्री शिव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी विधानभवनात चंद्रकांत दादा पाटील,गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास या गोष्टी आणल्या आहे.
याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले.त्यामुळे सांगली शहरातील कॉफी शॉप मालक- चालकाने आज शिवप्रतिष्ठांचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांची भेट घेतली. सदर बैठकीत कॉफी मालकाने आपल्या शॉप मधील कंपार्टमेंट काढावेत, अंधाऱ्या खोल्या,मादक द्रव्य, सिगारेट यांचा पुरवठा करू नये. अन्यथा कारवाईला समोर जावं लागेल असा इशाराही यावेळी नितीन चौगुले यांनी दिला.