आकोट
पावसाळ्यामध्ये रानात, वनात व डोंगर पायथा, माथ्यावर रानभाज्या उगवायला सुरुवात होते. या भाज्या अतिशय पौष्टिक, आरोग्यवर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम असतं. या भाज्यांची आदिवासी महिलांना ओळख असल्याने त्या भाज्यांचा त्यांच्या जेवणामध्ये समावेश असतो.आज रानभाज्यांचे हे ज्ञान वयस्क महिलांपर्यंतच सिमित आहे. नवीन पिढीतील महिला पुरुषांना दोन चार भाज्या सोडल्या तर त्यापलीकडे रानभाज्यांची ओळख नसल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे.
रानभाज्यांचे ज्ञान नवीन पिढीपर्यंत व शहरी लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून दि.9 ऑगस्ट मंगळवार रोजी पोपटखेड येथे रानभाजी शोध,संकलन व पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.जो स्पर्धक रानातून खाण्यायोग्य विषमुक्त जास्तीत जास्त भाज्या गोळा करेल,त्यांची ओळख, महत्व व त्याची पाककृती सांगेल त्यानुसार ते स्पर्धक विजयी ठरतील.
या स्पर्धेमध्ये 701,501,301 व प्रोत्साहनपर बक्षिस तसेच सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. तसेच ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन निसर्गातील रानभाजीचा अमुल्य ठेवा रक्षणासाठी सहकार्य करावे असे आवाहन स्पर्धेचे आयोजक अकोला जिल्हा काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष अनंत गावंडे व एकलव्य युवक मंडळ,पोपटखेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नावनोंदणी व अधिक माहिती करिता संपर्क:- विजेंद्र तायडे 9011367836 ,
पांडुरंग तायडे 9689262612 ,
प्रविण भगत 9763047114,
शिव गावंडे 8275393600
जानराव बेलसरे 7677398978
बाळु पाटील धांडे 9022550118 ,
लालजी पल्ली मावसकर 7499429182,
मुन्ना ढिगर 9850322699,
सदाशिवभाउ गवते 9527033667
स्थळ:- गोमाता मंदिर पोपटखेड
दिनांक:- 9ऑगस्ट दुपारी 2 वाजता