Thursday, September 19, 2024
Homeक्रिकेटICC WC 2023 | भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर…कोणता संघ कुणाशी...

ICC WC 2023 | भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर…कोणता संघ कुणाशी भिडणार?…वेळापत्रक पाहा

ICC WC 2023 : ICC ने एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा भारतात 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाईल. पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. 2019 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत हे दोन संघ आमनेसामने आले होते. हे दोन्ही संघ ५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहेत. त्याचबरोबर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या मैदानावर होणार आहे. ड्राफ्ट शेड्यूलमध्ये कोणताही मोठा बदल करण्यात आलेला नाही आणि 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या मैदानावर भारत पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.

या विश्वचषकात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी आठ संघ आधीच पात्र ठरले आहेत आणि उर्वरित दोन ठिकाणी झिम्बाब्वेमध्ये पात्रता फेरी खेळली जात आहे, ज्यामध्ये सहा संघ सुपर सिक्समध्ये पोहोचले आहेत. यातील दोन संघ भारतात होणाऱ्या विश्वचषकाच्या मुख्य फेरीत सहभागी होणार आहेत. सध्या पहिले दोन विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघ या विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. श्रीलंका आणि झिम्बाब्वेला मुख्य फेरीत खेळण्याची सर्वाधिक संधी आहे. उर्वरित दोन संघ विश्व चषकात सामील होणार याचाही निर्णय 9 जुलै रोजी होणार आहे.

या विश्वचषकात सर्व संघ इतर नऊ संघांसोबत राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळतील. यापैकी गुणतालिकेतील अव्वल चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि विजेते संघ अंतिम फेरीत खेळतील.

संपूर्ण भारतीय संघाचे वेळापत्रक
८ऑक्टोबर वि ऑस्ट्रेलिया चेन्नई

११ ऑक्टोबर वि अफगाणिस्तान दिल्ली १

१५ ऑक्टोबर वि पाकिस्तान अहमदाबाद

१९ ऑक्टोबर वि बांगलादेश पुणे

२२ ऑक्टोबर वि. न्यूझीलंड धरमशाला

२९ ऑक्टोबर वि. इंग्लंड लखनऊ

२ नोव्हेंबर वि. क्वालिफायर २ मुंबई

५ नोव्हेंबर वि. दक्षिण आफ्रिका कोलकाता

११ नोव्हेंबर वि. क्वालिफायर १ बंगळुरू

ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना १२ नोव्हेंबरला होणार आहे. यानंतर उपांत्य फेरीचे सामने १५ नोव्हेंबरला मुंबईत आणि १६ नोव्हेंबरला कोलकाता येथे होतील. अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: