ICC Champions Trophy – पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार असून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी)ही त्यासाठी तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ शेजारील देशात जाणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही, मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता फारच कमी आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आयसीसीला दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्यास सांगू शकते. याआधी गेल्या वर्षी आशिया चषकही हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते.
Indian Cricket team is unlikely to travel to Pakistan for the 2025 ICC Champions Trophy. BCCI will ask ICC to host matches in Dubai or Sri Lanka: BCCI sources to ANI pic.twitter.com/o7INJKhk1E
— ANI (@ANI) July 11, 2024
बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्याची शक्यता नाही, परंतु याबाबतचा अंतिम निर्णय सरकार घेईल. अशा स्थितीत हायब्रीड मॉडेलवर काम केले जाणार आहे. आशिया चषकाप्रमाणे, भारत आपला सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) किंवा श्रीलंकेत खेळू शकतो. तथापि, आयसीसी या संदर्भात निर्णय घेईल, परंतु सध्या आम्ही फक्त यावरच विचार करत आहोत. भविष्यात गोष्टी कशा प्रगती करतात ते पाहूया. सध्या तरी हे फक्त हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळले जाईल असे दिसते.