मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर
वाशिम – स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे कु. पुजा खेडकर (भा.प्र.से. ) परीविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना काही दिवसांपासून विविध प्रसार माध्यमांसह काही संघटनाद्वारे मानसिक त्रास दिला जात आहे. एका आयएएस महिला अधिकाऱ्याला नाहक त्रास देणे योग्य नाही. त्या ओबीसी प्रवर्गातून असल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करू नये. अशी मागणी जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी दि. 16 जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, कु. पुजा खेडकर (भा.प्र.से.) ह्या वाशीम येथे परीविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय सेवेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान त्यांची वाशीम येथे बदली करण्यात आली. दरम्यान त्यांची वरीष्ठ पातळीवरून चौकशी सुरू असतांना सुध्दा वाशीम येथे त्यांना जाणीवपुर्वक मानसिक त्रास दिला जात आहे. कु.पुजा खेडकर हया दिव्यांग प्रवर्गातुन येत असुन अशा दिव्यांग व्यक्तींना विनाकारण मानसिक त्रास देणे हि चुकीची बाब आहे. काही संघटना व प्रसार माध्यमांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसतांना सुध्दा त्यांना ओबीसी असल्यामुळे जाणीवपुर्वक लक्ष्य केल्या जात आहे.
यामुळे ओबीसी बांधवांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याआधीच राज्यभर ओबीसी विरूध्द मराठा असे वातावरण असतांना यापध्दतीने विनाकारण सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम काही मंडळी करीत आहेत. त्यामुळे प्रसार माध्यमाने सुध्दा याबाबतीत पुराव्याशिवाय विनाकारण प्रसिध्दी देऊ नये. यामुळे कु.पुजा खेडकर यांना मानसिक दृष्टया त्रास होत आहे. तसेच त्या दिव्यांग व महिला अधिकारी असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. व त्यांच्या बाबत केंद्र सरकारने जी समिती नेमली आहे त्या समितीमार्फत जी चौकशी होईल ती करण्यास कोणाचीही काही हरकत नसावी. असे निवेदनात नमूद आहे. याबाबत मागण्यांची पूर्तता न झाल्यास ओबीसी बांधवांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.
अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतांना प्रा. डॉ. अनिल राठोड, इंजि. सीताराम वाशीमकर, डॉ. रवी जाधव, किरणताई गिऱ्हे, गजानन धामणे, शितल राठोड, नागेश काळे, संदीप चिखलकर, शंकर वानखेडे, विष्णू राठोड, मिलिंद सुर्वे, छायाताई मडके, भगवान मडके, ज्ञानेश्वर गोरे, गजानन भेंडेकर, ओमप्रकाश फड, राहुल काळुसे, प्रल्हाद पाटील पौळकर, प्रा. अनिल काळे, सुनील कायंदे, अनिल गरकळ, केशव गरकळ, महादेव घुगे, रामराव कायंदे, अक्षय सानप, प्रमोद गरकळ, गजानन इप्पर, गजानन गरकळ,
भारत नागरे, रामभाऊ इप्पर, विजय राजगुरू, नारायण घुगे, काशिनाथ घुगे, बबनराव शिवराम, तुकाराम इप्पर, शेख सलीम कुरेशी, गजानन जायभाये, आर एस लाटे, जगन देवकर, भगवान मुंडे, प्रमोद जायभाये, गजानन मुंडे, गजानन भेंडेकर, देवानंद गुट्ठे, संदीप मुंढे, सतीश भेंडेकर, परमेश्वर मुसळे, अभिजीत घुगे, अरुण सांगळे आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विठू दिसतो सावळा कपाळी चंदनाचा टिळा आम्हा वारकऱ्यांना लागला देवा तुझ्या भक्तीचा लळा जय हरी विठ्ठल सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…