Ian Cameron : लक्झरी कार उत्पादक कंपनी रोल्स रॉयसचे माजी डिझायनर प्रमुख इयान कॅमेरॉन (७४) यांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर्मनीमध्ये असलेल्या त्याच्याच आलिशान राजवाड्यात त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. वृत्तानुसार, ही घटना 12 जुलै रोजी रात्री 9.20 वाजता (स्थानिक वेळेनुसार) घडली. हा खून करणाऱ्या व्यक्तीचे नाव जुर कोलस्टॅट असे असून त्याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयानच्या पत्नीने कसा तरी भिंतीवरून उडी मारून तिचा जीव वाचवला पण कॅमेरूनचा मृत्यू झाला. हल्लेखोराचा शोध घेण्यात पोलीस व्यस्त आहेत.
इयान कॅमेरूनचा मृतदेह त्यांच्या ३२.५ कोटी रुपयांच्या आलिशान महालाच्या दारात सापडला. हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. इयानची पत्नी भिंतीवर चढून शेजाऱ्याच्या घरी पोहोचली आणि तिथून पोलिसांना फोन केला. इयान कॅमेरॉन विंटेज कारमध्ये तज्ञ होते. ते 2013 मध्ये रोल्स रॉइसमधून निवृत्त झाले. त्यांनी या कंपनीत सुमारे 20 वर्षे काम केले आणि 3 सीरीज, Z8, फँटम आणि घोस्ट सारख्या अनेक उत्कृष्ट कारच्या डिझाइनवर काम केले. पोलिसांनी या घटनेचे वर्णन हिंसक गुन्हा असे केले असून हत्येनंतर हल्लेखोर तेथून पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.
सीसीटीव्हीच्या तारा कापलेल्या आढळल्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयान कॅमेरॉनच्या गॅरेजमध्ये अनेक महागड्या गाड्या ठेवण्यात आल्या होत्या. गॅरेजमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तारा कापलेल्या आढळल्या. मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पोलीस कुत्रे आणि हेलिकॉप्टरची मदत घेत आहेत. या घटनेबाबत रोल्स रॉयलकडून एक निवेदनही समोर आले आहे. कंपनीने सांगितले की, आम्हाला मोठा धक्का बसला आहे. इयान कॅमेरॉन 1999 ते 2012 या काळात रोल्स रॉइस मोटर कारचे डिझाईन संचालक होते. कंपनीने पुढे सांगितले की बीएमडब्ल्यूने विकत घेतल्यापासून रोल्स-रॉइसला आकार देण्यात इयानने महत्त्वाची भूमिका बजावली. या दु:खाच्या वेळी त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत आमचे विचार आहेत.