Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनमी ऑल द बेस्ट नाटक विनोदी अभिनेता पुरस्कार जिंकला...

मी ऑल द बेस्ट नाटक विनोदी अभिनेता पुरस्कार जिंकला…

मुंबई – नमस्कार मी मयुरेश पेम. आमच्या ऑल द बेस्ट नाटकाला रसिक मायबापांनी तुफान रिस्पॉन्स दिला आहे. नाटकाचे प्रयोग धुमधडाक्यात सुरू आहेत. माझं काम आवडलं खूप आवडलं असं प्रयोगानंतर रसिक मायबाप सांगतात तेव्हा खूप आनंद होतो. या आनंदात आणखीन एक भर पडली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचा व्यावसायिक नाटक 2024 “सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता” हा पुरस्कार मला ऑल द बेस्ट नाटकासाठी मिळाला आहे.

हा पुरस्कार माझे अत्यंत लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर आणि दिग्गज दिग्दर्शक व शंभराव्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर जब्बार पटेल सर यांच्या हस्ते मला मिळाल्याने आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. त्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना खूप भारावून गेलो. महाराष्ट्राचे लाडके नेते माननीय शरद पवार साहेब.. उद्योग मंत्री उदय सामंत साहेब..

माननीय शशी प्रभू साहेब.. दिग्गज अभिनेते निर्माते व अध्यक्ष प्रशांत दामले सर, अशोक हांडे सर, आणि नाटक अखिल भारतीय नाट्य परिषदेचे मी मनापासून आभार मानतो. तसेच ऑल द बेस्ट नाटकाचे लेखक दिग्दर्शक माझे बाबा देवेंद्र पेम सर व ऑल द बेस्ट चे सर्व सहकलाकार तंत्रज्ञ व बॅकस्टेजच्या संपूर्ण टीमचा मी अत्यंत ऋणी आहे. या साऱ्यांमुळे.. त्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच मला हा पुरस्कार मिळाला आहे.

पुरस्कार मिळणे ही आपल्या कामाची पावती तर असतेच पण त्याचबरोबर जबाबदारीची जाणीवही करून देते. यापुढे मी रंगभूमीची सेवा करताना अशाच चांगल्या भूमिका करत राहण्याचा आणि रसिक मायबापांचं मनोरंजन करण्याचा मनापासून आयुष्यभर प्रयत्न करत राहीन. पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि खूप खूप प्रेम. ऑल द बेस्ट नाटक बघायला नक्की या

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: