Thursday, November 28, 2024
Homeराज्यमी शाहीरांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिल - चंद्रपाल चौकसे...

मी शाहीरांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा राहिल – चंद्रपाल चौकसे…

शासन यांनी शाहीर कलाकार यांच्या मागण्या लवकर पूर्ण करावे – शाहीर राजेंद्र बावनकुळे

अबकी बार किसान आणि शाहीर कलाकार सरकार- कवी वाकुडकर

कामठी – राजू कापसे

भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळावा हजारोंच्या उपस्थितीत राम मंदिर सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले.शाहीर कलावंतांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन मुलीकडे विशेष लक्ष द्यावे तसेच शाहीर कलावतांचा पाठीशी नेहमी खंबीरपणे उभा असून आपल्या समस्या सोडवण्यासाठी रामटेक क्षेत्रात विशेष महिलांनी पूर्ण ताकत पणाला लावावे. असे शब्दात उदगार चंद्रपाल चौकसे यांनी रामटेक क्षेत्रात उमेदवारीची घोषणा केली.

कामठीच्या राम जानकी सभागृहात विदर्भ स्तरीय भव्य सांस्कृतिक मेळावा हजारोच्या संख्येने पार पडला. यावेळी राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तूमाने कार्यक्रमात उपस्थित नसल्याने कलावंतात नाराजीचl सूर होता. कलावंतांना मिळणाऱ्या मानधनात वाढ होण्याची अपेक्षा होती आणि इतर मागणीची पूर्तता करण्यासाठी विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शाहीर कलाकार मंडळी या आशेने मेळाव्यात हजेरी लावली होती.

नेहमीप्रमाणे त्यांच्या पदरी निराशा पडली यावेळी शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की 20 डिसेंबर 22 ला हिवाळी अधिेशनादरम्यान शाहीर कलाकार मोर्चा काढण्यात आला होता,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते परंतु आतापर्यंत एक पण मागणी त्यांनी पूर्ण नाही केली,केंद्र सरकार,महाराष्ट्र सरकार यांनी कलाकार यांच्या मागण्या लवकर पूर्ण करावे,

तुटपुंजे मानधन मध्ये वाढ करण्यात यावी अशी विनंती शाहीर राजेंद्र बावनकुळे यांनी केली.भारत राष्ट्र समिती विदर्भ प्रमुख कवी ज्ञानेश वाकुडकर यांनी सरपंच झाल्या बायका ,शाहिरी गीत म्हणून प्रेक्षक यांना मंत्र मुग्ध केले,यावेळी सांगितले की तेलंगणा सरकार शाहीर कलाकार यांना महाराष्ट्र सरकार पेक्षा जास्त मानधन देत आहे,

अब की बार किसान आणि शाहीर कलाकार सरकार अlना तुमच्या पूर्ण मागण्या आम्ही पूर्ण करू असे आश्वासन वाकुडकर यांनी दिले.मानधन समिती उपाध्यक्ष आनंदराव ठवरे यांनी सर्व शाहीर कलाकार यांना सांगितले की मी इमानदारीने कलाकार यांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करील.मेळाव्यात रामटेक क्षेत्राचे सुपुत्र चंद्रपाल चौकसे, माजी आमदार देवराव रडके,काँग्रेसचे नरेश बर्वे,राजू हिंदुस्थानी, माजी जिल्हा उपाध्यक्ष शरद डोणेकर, विजय हटवार,

कवी ज्ञानेश्वर वांढ रे ,यांनी मार्गदर्शन केले.शाहीर नाना परीहार,जालना, सरपंच पंकज साबळे ,पंकज बावनकर शाहीर गरीबा काळे,अंबादास नागदेवे,शंकर येवले,सुबोध गुरुजी,मोरेश्वर मेश्राम,पुरुषोत्तम खांडेकर,ब्रम्हा नवघरे,वसंता कुंभरे,अजय धोपटे,विक्रम वांढरे,संजय मेश्राम,ललकार चौहान,उर्मिला, जया बोरकर, योगिता नंदनवlर,

दीपमाला मालेकर,मोहन बारसlगडे गोंदिया, रविबाबु हजारे,नरेंद्र महल्ले, प्रकाश काळे,सुभाष वंगर, डॉ शंकर भोंगेकर,दयाल कांबळे,राजेंद्र येसकर प्रामुख्याने उपस्थित होते. या मेळाव्यात कलावंतांनी आपले कलेचा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व प्रमाणपत्र देण्यात आले.

याप्रसंगी आलेल्या अनेक शाहीर कलावंत, भंजन मंडळ, लोक कलावंत यांनी आप-आपल्या कलेचे सादरीकरण प्रस्तुत केले. विशेष सुरज नवघरे युवा शाहीर कलाकार आपल्या पोवाडा सादर करून सर्वांना मंत्रमुगद करून दिले. युवा शाहीर आर्यन नागदेवे,सरपंच शाहीरl जया बोरकर यांचे सत्कार करण्यात आले.

मेळाव्याचे आयोजक शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे ,गणेश देशमुख,अरुण मेश्राम,भगवान लांजेवार भूपेश बावनकुळे यांनी केले. यावेळी विशेष सहयोग शाहीर प्रदीप कडबे, चीरकुट पुंडेकर ,विनायक नlगमोते ,नरेंद्र दनडारे ,गजानन वडे,सुभाष देशमुख,वीरेंद्र सिंह शेंगर,रवींद्र मेश्राम,गिरिधर बावणे,शिशुपाल अतकरे,मोरेश्वर बडवाईक,दशरथ भडंग,प्रकाश राऊत, रमजान शाह,महादेव पlरसे,युवराज अडकणे, भगवान वानखेडे,

नत्तूजी चरडे,विमल शिवारे,रमेश रामटेके ,सुनील सरोदे,कार्यक्रमाचे संचालन ,नरेश देशमुख, सुरज नवघरे यांनी केले तर आभार प्रदर्शन ,शाहीर अरुण मेश्राम,भगवान लांजेवार यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीर मधुकर शिंदेमेश्रम,प्रल्हाद सावरकर,लीलाधर,रामराव वडांद्रे, रायभान करडभाजने,रवी दूपारे,

पुरुषोत्तम कुंभलकर, शालीक शेंडे,यशोदा सोमणाथे,चेतना शेंडे,इंदल सोमणाथे,नितीन लांजेवार,दीपक दहिकर, आशू निंदेकर,अरूणा बावनकुळे,अंकुश डडमल,श्रावण लांजेवार, फागो कावळे,सखाराम डहाके,वासुदेव तिजारे आणि शेकडो शाहीर कलाकार यांनी परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: