पातुर – निशांत गवई
पातुर अकोला महामार्गावरील नांदखेड फाट्या समोर गुरुवार 9 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान दुचाकीने जात असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत राठोड हे आपले कर्तव्य बजावून अकोलाकडे घरी जात असताना त्यांना चक्क आठ ते दहा फुटा समोर अंतरावरून बिबट्या आडवा जातानी दिसल्यामुळे चक्क घाम फुटला होता.
मात्र सुदैवाने तो निघून गेला व मी सुद्धा मोठ्या हिमतीने दुचाकीने चिखलगाव कडे सुखरूप पुढे आलो. सदर नांदखेड फाट्यावर गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता दरम्यान अचानक समोरून बिबट्या चालत जात असल्यामुळे मला काही क्षण काही सुचलेच नाही.
मागे जाऊ का पुढे जाऊ काही समजत नव्हते मात्र मोठ्या हिमतीने न डगमगता न घाबरता गाडी समोर नेली. पुढे गेल्यावर जीवात जीव आला. देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती आली.
असा अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम लोकमत प्रतिनिधी बोलताना व्यक्त केला. नागरिकांनी सायंकाळी उशिरा या रस्त्यावरून जाताना सावधानतेने वाहने चालवावी व सतर्कता बाळगावी असे आव्हान सुद्धा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसंत राठोड पोलीस स्टेशन पातुर यांनी केले आहे