Sunday, December 22, 2024
Homeराज्यआय. एल. एस. विधि महाविद्यालयात १४ वी आंतर - महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व...

आय. एल. एस. विधि महाविद्यालयात १४ वी आंतर – महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न..!

पुणे, दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी मंगळवार, इंडियन लॉ सोसाईटीचे आय. एल. एस. विधि महाविद्यालय, पुणे तर्फे ‘मराठी वादसभा’ आयोजित ‘१४ वी आंतर – महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ नुकतीच उत्साहात पार पडली.

यावर्षी ‘शताब्दी वर्ष’ साजरे करणाऱ्या आय. एल. एस. विधि महाविद्यालयाचे कायदा क्षेत्राबरोबरच केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या सांस्कृतिक,सामाजिक व राजकीय जडणघडणीत अनन्यसाधारण योगदान आहे.

विधि महाविद्यालयात मराठी भाषेसाठी ‘मराठी वादसभा’ कार्यरत आहे. कायद्याचे मराठीमध्ये ज्ञान आणि कायद्याच्या क्लिष्ट तरतुदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम अविरतपणे करत आलेली आहे. त्याचबरोबर,कायद्याचे बोला,स्वछंद,मराठी अभिरुप न्यायालय व राज्यतरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन वादसभा करते.

राज्यभरातील विद्यार्थांना आपले मत परखडपणे मांडण्यासाठी व वक्तृत्व कलेसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या अनुषंगाने दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत राज्यभरातील महाविद्यालयातून एकूण ४६ स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे खास वैशिट्य म्हणजे वैचारिक,सांस्कृतिक,संतसाहित्यविषयक,राजकीय,सामाजिक व कायदेविषयक असे नानाविविध पैलू व वैचारिक खाद्य असलेले स्पर्धेचे विषय आणि आकर्षक पारितोषिके.

स्पर्धेचे विषय :

१. ‘टाळी’ आणि न्याय – प्रतिक्षा पिढ्यांची.
२. विरोधी पक्षाचे अस्तित्व: लोकशाहीची लिटमस टेस्ट
३. फँड्री ते सैराट : आधुनिक मानसिकतेची मागास पाऊलवाट
४. माझ्या मराठीची बोलू कौतुके- पण इंग्रजीत !
५. काय करुन आता धरुनिया भीड।
नि:शक हे तोंड वाजविले ॥

स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या स्पर्धकांना महाविद्यालयातर्फे प्रशस्तीपत्र,सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आणि प्रत्येक सहभागी स्पर्धकास प्रमाणपत्र देण्यात आले.

स्पर्धेचे विजेते :

१) प्रथम क्रमांक- कृणाल रामेश्वर बेद्रे -श्री शिवाजी लॉ कॉलेज,परभणी
१०,०००/ रोख,+सन्मानचिन्ह+ प्रशस्तीपत्र
२) द्वितीय क्र.- यश रविंद्र पाटील

बी.के.बिरला कॉलेज,मुंबई
७०००/रोख+ सन्मानचिन्ह+ प्रशस्तीपत्र
३) तृतीय क्रमांक – रोहन कवडे – संस्कार मंदीर महाविद्यालय,पुणे
५०००/रोख + सन्मानचिन्ह+ प्रशस्तीपत्र
उत्तेजनार्थ – भाग्यलक्ष्मी बाळू क्षीरसागर – फर्ग्युसन महाविद्यालय,पुणे
२०००/रोख + सन्मानचिन्ह+ प्रशस्तीपत्र
उत्तेजनार्थ- अभय आळशी

वझे केळकर महाविद्यालय,मुंबई

२०००/ रोख + सन्मानचिन्ह+ प्रशस्तीपत्र स्पर्धकांना वक्तृत्वाकरिता ५+२ मिनिटे देण्यात आली होती. परीक्षकांनी तटस्थ व पारदर्शकपणे परीक्षण करून निकाल घोषित केला.

यावेळी स्व. रावबहादूर नारायणराव बोरावडे ट्रस्ट हे मुख्य प्रायोजक होते. विशेष म्हणजे वादसभेची लालपरी, अनेक मराठी कादंबरयांची चित्रे असलेली पताके, मराठी चित्रपटांचा फलक, माहितीपत्रके इत्यादी सजावटींनी बाहेरून येणाऱ्यांचे लक्ष वेधले होते.

स्पर्धा समन्वयक महविद्यालयातील स.प्रा. मुग्धा हेडाऊ व स.प्रा. सई ताम्हणकर,विद्यार्थी समन्वयक – प्रशिक राक्षे, प्रतीक जानकर, रेणुका सुलाखे, शांतनू गायकवाड आणि वादसभेच्या सर्व सदस्य विद्यार्थांनी स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी परिश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: