देशात नुकत्याच लोकसभा पार पडल्यात तर येणाऱ्या चार महिन्यात राज्यात कधीही विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. यासाठी सर्व राजकीय पक्ष मोर्चे बांधणीला लागले आहेत तर अनेक मतदार संघात काही प्रसिध्दी पिसाट कोणत्याही पक्षाचा ठावठिकाणा नसून मागील वर्षापासून सक्रिय सुध्दा झाले. तर मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघाची अशीच परिस्थिती आहे. लोकसभेत राज्यात ४० पेक्षा जास्त जागांचा दावा करणारे भाजपला 9 जागेवरच समाधान मानावे लागले. त्यामुळं राज्यात विधानसभा निवडणुकीतही भाजपला फटका बसणार असल्याचे राजकीय विश्लेषकांच मत आहे. तसेच अकोला जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा दबदबा राहणार असल्याचे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर लक्षात येते.
अकोला लोकसभेत खासदार अनुप भाऊ धोत्रे हे 40 हजार मतांनी विजयी झाले तर अनुप भाऊला मी एकट्याने माझ्या मतदार संघातून 8 हजार मतांचा लीड दिला असल्याच्या भाऊची चर्चा मोठ्या प्रमाणात पसरली. भाऊ अतिउत्साही कार्यकर्ते तर विचारूच नका अनुप भाऊच्या पुढे पुढे करून फोटो काढून भाऊच्या अगोदर सोशल मीडियावर टाकून मोकळे. ज्यांनी खरी मेहनत घेतली ते मात्र चुपचाप, फोटो पाहून अनेकांच्या तोंडून भाऊचा उध्दारही झाला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी कोण कुठी होते हे अनुप भाऊला चांगलेच ठावूक असणार. प्रत्यक्षात जमिनीवर मेहनत करणारे तळागाळातील बरेच कार्यकर्ते काही zp सदस्य यांनी स्वतच्या पैश्यानी आपापल्या कार्यक्षेत्रात टीम घेऊन प्रचार केला, ज्याच्याकडे खर्च करण्याची जबाबदारी होती त्यांनी बरोबर वेळ मारून नेली श्रेय मात्र स्वतः च घ्यायचं.
भाऊ,2019 विधानसभेच्या वेळी आवेशात येवून डॉ रणजित पाटील यांच्याविषयी अपशब्द बोलले होते तेव्हा प्रचाराच्या वेळी 10 दिवस घरातच होते तेव्हा हेच अनुपभाऊ होते यांनी बार्शीटाकळी भागात दिवस रात्र मेहनत करीत होते म्हणूनच तुम्ही निवडून आले आणि तुमच्या शहरातून अनुपभाऊ ला कितीचा लीड मिळाला?…अनुप भाऊ च्या विजयाचे अनेक शिल्पकार आहेत त्यांनी कधी गवगवा केला नाही त्यांनी प्रामाणिक पणे पक्षाचे काम केले,तुम्ही एकटे नव्हे…