पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांना सहा तासांहून अधिक चौकशीनंतर मध्यरात्री अटक केली. राऊत यांनी मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून त्याला फसवले जात आहे. त्याचवेळी मेडिकलनंतर त्याला आज पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी राऊत यांच्या आईचे सांत्वन केले. त्यांनी राऊत यांच्या पत्नी आणि मुलीचीही भेट घेतली. ”संकटाच्या काळात मी तुमच्या सोबत आहे”, असा शब्द त्यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांना दिला.
काल रविवारी संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या आईंना अश्रू अनावर झाले होते. त्यांचा तो भावूक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता, या व्हिडीओ मध्ये परिवारातील इतर सदस्यदेखील भावूक झाल्याचे बघायला मिळाले. संकटाच्या काळात शिवसेना त्यांच्या पाठिशी आहे, हे दाखवण्याचा उद्ध ठाकरेंचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांच्या आईंना धीर देण्यासाठी उद्धव ठाकरे राऊत यांच्या निवास्थानी पोहोचले आहे.