Monday, December 23, 2024
Homeराज्यमी सायली तळेकर एक मुंबई पोलीस...

मी सायली तळेकर एक मुंबई पोलीस…

मला लहापणापासून डान्स आणि मॉडलिंग ची खूप आवड होती आणि मी लहनपणापासून डान्स करते आहे. शाळा आणि कॉलेज मध्ये 12 मे 2011 रोजी माझ्या वडिलांचे चे निधन झाले त्यामुळे माझा घरी कमवणार कोण नव्हते भाऊ आणि बहीण खूपच लहान होते. त्यामुळे मला माझ्या पापा च्या जागेवर पोलिस मध्ये भरती झाले.

पोलिस खात्याची काहीच माहिती नव्हती पण झाले भरती. मला वाटले की मी आता माझे स्वप्ने नाही पुर्ण करू शकणार नाही. पण मी जिद्दीने पोलीस भरती झाली आणि ट्रेनिंग वरून परत आले वेगळे वेगळे ठिकाणी नोकरी केली सगळे काही नवीन च होते,

मग 2015 ला मी आमच्या पोलिस मेळावा मध्ये डान्स केला ,खूप छान वाटले त्यानंतर मी महाराष्ट्र राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा मध्ये पोलिस टीम मधून भाग घेऊ लागली त्यानंतर उमंग सारख्या मोठ्या स्टेज वर 2016 शाहरुख खान सर, 2022 अक्षय कुमार सर, 2023 सलमान खान सर यांच्या बरोबर डांस केले आहे मी 2023 मध्ये The plant Stylist beauty contest मध्ये सहभाग केले त्या मध्ये मी संपूर्ण महाराष्ट्र मधून विजेता झाली.

मला modeling मधून खूप अवॉर्ड मिळाले. मला 2023 मध्ये इंडिया स्टार गौरव पुस्काराने सन्मानित केले आहे.
मी LOT सारख्या मोठ्या शो मध्ये शोस्टॉपर म्हणून रनवे वॉक केला आहे.

मी पोलिस असून मी माझे स्वप्न सोडले नाही. आणि मी हे सगळे करण्यासाठी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परममिशन घेतली आणि आज काम करत करत सर्व क्षेत्रात प्राविण्य मिळवत आहे…

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: