सांगली – ज्योती मोरे
नातेवाईकांच्या घरात लाखोंची चोरी करून त्या पैशातून सोन्याचे दागिने खरेदी केलेल्या आणि हे पैसे आणि दागिने घेऊन परगावी चाललेल्या सुभानल्ला मुसा नदा वय 29 वर्षे व मोबीना सुभानल्ला नदाफ वय 21 वर्षे दोघेही राहणार किसान चौक मार्केट यार्ड सांगली. या दोघा पती-पत्नींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सांगली जिल्ह्यातील उघडकीस ना आलेल्या घरफोडी गुन्ह्यांबाबत तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथका च्या माध्यमातून तपास चालू असताना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सुभानल्ला मुसा नदाफ व त्याची पत्नी मोबीना नदाफ या दोघांनी कोठेतरी चोरी करून आणलेले पैसे व सोन्याचे दागिने पिशवीत घेऊन ते बाहेर गावी चालले असल्याचे व सध्या ते शांतीवन चौक इनाम धामणी सिटी बस स्टॉप जवळ थांबले असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे इनाम धामणी शांतीवन चौक सिटी बस स्टॉप जवळ पाहिले असता तेथे फिकट हिरवा शर्ट व निळी जीन्स पॅन्ट तसेच काळा बुरखा व काळ्या रंगाचा नकाब घातलेले जोडपे हातात पिशवी घेऊन थांबलेले दिसले. दोघांना पिशवीसह ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील पिशवी तपासली असता त्यामध्ये रोख रक्कम व सोन्याचे दागिने मिळून आले. त्यावेळी त्यांच्याकडे मिळून आलेल्या पैशांची आणि दागिन्यांच्या मालकी हक्काबाबत पावती तसेच कोठून आणले?कोठे घेऊन चालला?
याबाबत चौकशी केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, काही दिवसापूर्वी शेजारी राहणारे नातेवाईक युनूस नदाफ यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून आत जाऊन, कपाटातील रोख रकमेची चोरी केली होती. तीच रक्कम पिशवीमध्ये असल्याचे व त्याच पैशांमधून दागिने खरेदी केले असल्याचे सांगितले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी त्यांच्या जवळील तीन लाख 85 हजार रुपये रोख व एक लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचे चोरीच्या पैशातून खरेदी केलेले सोन्याचा नेकलेस सोन्याची कर्णफुले असा एकूण 5 लाख 17 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, बिरोबा नरळे, संदीप गुरव, निलेश कदम, संदीप पाटील, सागर लवटे, अनिल कोळेकर ,सागर टिंगरे, विक्रम खोत, जितेंद्र जाधव, संतोष गळवे,सुरेखा कुंभार, रंजना कलगुटगी, शुभांगी मुळीक, स्नेहल पाटील, आदींनी केली आहे.