Sunday, November 17, 2024
Homeराजकीयभारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी शेकडो चिमुकले महात्मा गांधींच्या वेशभूषेत...

भारत जोडो यात्रेच्या स्वागतासाठी शेकडो चिमुकले महात्मा गांधींच्या वेशभूषेत…

किड्स पॅराडाईजचा उपक्रम बनला यात्रेकरूंचा सेल्फिपॉईंट

पातूर – निशांत गवई

पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल च्या शंभर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींची वेशभूषा साकारून भारत जोडो यात्रेचे स्वागत केले. संपूर्ण भारतातून भारत जोडो यात्रेसाठी आलेल्या यात्रेकरुनी सेल्फी काढण्यासाठी एकच गर्दी केली होती. पातूर मधील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा हा अभिनव उपक्रम या यात्रेतील चर्चेचा विषय बनला आहे.

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने बुधवारी मुक्काम करून गुरुवारी सकाळी मार्गक्रमण केले. सकाळी 6.30 वाजता खासदार राहुल गांधी यांनी पोलीस स्टेशन चौकातून यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ महात्मा फुले वेशभूषेत महाराष्ट्र माळी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश तायडे यांच्या नेतृत्वात यात्रेचे स्वागत केले.

त्यांनतर रॅली बाळापूर रोडवर आल्यानंतर किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या शंभर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांची वेशभूषा साकारली होती. राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्याना हात जोडून धन्यवाद व्यक्त केले. त्यानंतर संपूर्ण भारतभारातून आलेल्या यात्रेकरुना सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. हा अभिनव उपक्रम पातूर तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.

किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक गोपाल गाडगे आणि कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी भारत जोडो यात्रा हा म्युझिकल ड्रामा सादर केला. यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामेश्वर बरगट उपस्थित होते.

याप्रसंगी किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, अविनाश पाटील, बजरंग भुजबटराव, नरेंद्र बोरकर, वंदना पोहरे, नितु ढोणे, शीतल कवडकर, लक्ष्मी निमकाळे, नयना हाडके, प्रियंका चव्हाण, भारती निमकाळे, योगिता देवकर, अश्विनी अंभोरे, पल्लवी पाठक, पल्लवी खंडारे, हरिष सौंदळे, वंदना पोहरे, शुभम पोहरे आदींसह संतोष लसनकर, सुनील पाटील, गणेश कारंगळे आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: