Sunday, December 22, 2024
Homeराज्यरामटेक तालुक्यातील शेकडो भगिनींनी राजेंद्र मुळक यांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधनाचा...

रामटेक तालुक्यातील शेकडो भगिनींनी राजेंद्र मुळक यांना राखी बांधून साजरा केला रक्षाबंधनाचा सन…

रामटेक – राजु कापसे

आज दिनांक 30/08/2023 रोज बुधवार ला रामटेक तालुक्यातील कवडक दुधाळा टेकडी येथे आनंदधाम रामटेक च्या सौजन्याने भागवत कृपा प्राप्ती षष्टी निमित्त पूर्व प्रभात यात्रा 75 वर्ष स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव व्यसनमुक्ती व स्वच्छता अभियान अंतर्गत रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सोहळ्यात प्रमुख उपस्तिथीत म्हणून मा.श्री.राजेंद्रजी मुळक ( माजी मंत्री तथा अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांना शेकडो बहिणींनी राखी बांधून रक्षाबंधनाचा सन आनंदात व उत्साहात साजरा केला.

आपला समाज व्यसनमुक्त व्हावा, स्वच्छतेचे महत्व लोकांना कळावे, आपापसात बंधुभाव निर्माण व्हावा अशा विविध उद्देशाने मा.श्री.लक्ष्मणराव मेहर (बाबूजी) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री. दामोधर धोपटे (अध्यक्ष शहर काँग्रेस कमेटी), सौ. अपर्णाताई वासनिक (सरपंच ग्रा प सोणेघाट),

श्री. नीलकंठ महाजन (संचालक कृ. उ. बा. स. रामटेक), श्री. राहुल कोठेकर, श्री. अनिल वाघमारे, श्री. रमेश बिरणवार, श्री. बबलू दुधबर्वे, सौ. कंचनताई माकडे, सौ. शारदाताई बर्वे, सौ. विमलताई नागपुरे, सौ. प्रीतीताई मेहर, सौ. भारतीताई वाघाडे, सौ. शालूताई मोहनकर, सौ. रेखाताई माकडे, सौ. अर्चनाताई माकडे, सौ. पिंकीताई बरडे,

सौ. सुनीताताई मते, सौ. पूजाताई फटींग, सौ. वनिताताई मोहनकर, सौ. अर्चनाताई अनकर, सौ. सीमाताई नागपुरे, श्री. अशवीन शेंडे, श्री. शुभम कांबळे, श्री. अश्विन सहारे, श्री. भीमा नागपुरे, श्री. संजय बागडे, श्री. वसंत धुंडे, श्री. किशोर खडदो, श्री विनोद देवघरे, श्री. सखाराम ठाकरे, श्री. फत्तुजी कारामोरे इत्यादी प्रमुख पाहुणे, परमात्मा एक सेवक सेविका व बालगोपाल यांच्या उपस्तिथीत कार्यक्रम पार पडला.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: