Sunday, November 17, 2024
Homeराज्यहिट अँड रन कायद्या विरोधात शेकडो वाहन चालकांनी केला सुभाषनगर येथे रास्तारोको...

हिट अँड रन कायद्या विरोधात शेकडो वाहन चालकांनी केला सुभाषनगर येथे रास्तारोको…

अहेरी – मिलिंद खोंड

अखील महाराष्ट्र वाहन चालक संघटनेच्या वतिने केन्द्र सरकारने केलेला हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द करावा ही मागणी घेऊन वाहन चालक संघटनेने शुक्रवारी सुभाषनगर फाट्यावर रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करुन केन्द्र सरकारचे लक्ष वेधन्यात आले.

केंद्र सरकारने नुकताच संसदेत “हिट अँड रन ” कायदा पारित केला असुन या कायद्यामुळे अपघात स्थळावरून गाडी चालक निघून गेल्यास त्याला सरसकट दहा वर्षे कारावास आणि सात लाख रुपयाचे दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात करण्यात आली आहे.

एखाद्या ठिकाणी चुकुन अपघात घडल्यास जखमीना मृत्यूच्या दारी सोडून जाणे हे अमानवीय कृत्य आहे, त्यामुळे कोणताही वाहन चालक अपघात ग्रस्ताला घटनास्थळी सोडुन जाऊ इच्छित नाही मात्र बरेच वेळा अपघातग्रस्त वाहन चालकाची चुक नसतांना देखील संतप्त नागरिक आणि जमवाकडून वाहन चालकाला बेदम मारझोड करुन त्याच्या गाडीची तोडफोड करतात व एखाद्या वेळी जमावाकडुन प्राणघातक हल्ले केल्या जातात.

परीणामी निष्पाप वाहन चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्नही केला जातो.त्यामुळे स्वत:च्या संरक्षना करीता काही वाहन चालक घटना स्थळावरून पळ काढतात. त्यांच्या या कृतीमुळे त्यांना अपघातास जबाबदार धरून त्यांना “हिट अँड रन” कायद्याखाली कठोर शिक्षेचा केन्द्र सरकारने निर्णय घेतलेला आहे.  

ह्या कायदाने वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाच्या मनात अत्यंत भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.आणि हा कायदा वाहन चालकावर अन्याय करणारा आहे. हा कायदा केन्द्र सरकारने तात्काळ रद्द करावा या करीता या पुर्वी आलापल्ली येथे वाहन चालक संघटनेच्या वतिने एक दिवशीय निषेध सभा घेऊन केन्द्र शासनाचे लक्ष वेधले गेले परंतु देशभरातील वाहन चालकाच्या आंदोलनाची केन्द्र सरकारने दख्खल घेतलेली नाही.

आणि म्हणुन देशभरातील प्रत्येक राज्यात व प्रत्येक जिल्ह्यातील शहरी भागापासुन तर ग्रामीण भागापर्यंत वाहन चालकाकडुन स्टेरींग बंद व लोकशाहीच्या मार्गाने अनेक आंदोलन होत असताना अखील महाराष्ट्र वाहन चालक संघटना अहेरी,आलापल्लीच्या वतिने सुभाषनगर येथे सकाळी 10.00 पासुन केन्द्र सरकारच्या चुकीच्या निर्णया विरोधात शेकडो वाहन चालकाच्या वतिने रास्तारोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले आणि केन्द्र सरकारने हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द न केल्यास येत्या काळा तिव्र आंदोलन करणार असल्याचे वाहन चालकानी सांगीतले.

या आंदोलनात काँग्रेस नेते जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यानी सहभाग नोंदवुन पाठींबा दर्शविला आंदोलना स्थळी अतिरीक्त पोलीस अधिक्षक एम रमेश ,पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड,अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे,एपीआय विजय चव्हान तथा बहुसंख्य पोलीस बंदोबस्त तैनात होते.

या वेळी अखील महाराष्ट्र वाहन चालक संघटनेचे अध्यक्ष बाळु बांगरे तसेच आंदोलन कर्ते वाहन चालक राहुल शुक्ला ,संदीप मडावी,प्रविन लिंगनवार,तुकाराम धुर्वे,नागेश मारेन,प्रशांत अलगमकार,अनिल पुलगमकार,विशाल मडावी,किशोर मंटकवार,विठ्ठल गेडाम,श्रीनिवास कनमवार,गणेश सोनकरस,पंकज साव,राहुल सिंघ,हिरालाल जाधव,आनंदभाई,

पवन गोसावी,सर्वेश गोसावी,निशाद मसरामसुभाष राम,अशोक खोब्रागडे,नंदकुमार डोके,सागर हिचामी,दुशांत पेंदाम,प्रफुल रोहनकर,परवेश पठान,शरद झाडे,राजु गावडे,राहुल डोके,शंकर चांदेकर,सुनिल एकोनकार,संजय हिचाम क्रिष्णा गावडे यासह निषेध सभेला अहेरी तालुक्यातील असंख्य वाहन चालक उपस्थीत होते.

Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: