सांगली – ज्योती मोरे.
मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आज सांगलीत जिल्ह्यातील समस्त मराठा समाजाच्या वतीनं सांगलीतील विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौकादरम्यान प्रचंड मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं.
जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जरंगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले अनेक ठिकाणी आंदोलन उभी राहिली, तर बंदही पाळण्यात आले.
त्याचाच एक भाग म्हणून आज सांगलीतही समस्त सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौकादरम्यान प्रचंड मोर्चा काढण्यात आला .सदर मोर्चात माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजीत कदम,माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आम जयंत पाटील,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील ,तासगावच्या आमदार सुमनताई पाटील ,
श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे ,मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक प्रशांत भोसले ,डॉक्टर संजय पाटील यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी,कार्यकर्ते तसंच मराठा समाजातील विद्यार्थी, महिला आणि बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.