Sunday, December 22, 2024
HomeMarathi News Todayअमरावतीत 'सत्यशोधक' चित्रपट बघायला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी...अभिनेते विश्वकर्मा प्रेक्षकांच्या भेटीला...

अमरावतीत ‘सत्यशोधक’ चित्रपट बघायला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी…अभिनेते विश्वकर्मा प्रेक्षकांच्या भेटीला…

अमरावती : दुसर्या आठवड्यातही सत्यशोधक मोठा धूम करीत आहे. काल सत्यशोधक चित्रपटांची टीम व या चित्रपटात लहूजी यांची भूमिका साकारणारे अभिनेत सुरेश विश्वकर्मा हे काल प्रेक्षकांसोबत हितगुज साधण्यासाठी अमरावतीच्या राजकमल चौकातील राजलक्ष्मी या चित्रपटगुहात आले त्यावेळी अमरावतीकरांनी त्यांचे जंगी स्वागत केले. यावेळी चित्रपट गृहात असंख्य प्रेक्षकांनी गर्दी केली होती.

दिनांक 5 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला सत्यशोधक चित्रपट होय, बालगोपालांपासून ते आजी आजोबांनी बघावा असा हा चित्रपट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा माहितीपट नाही तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या जीवनातील चढ उतार, सुख दुःखाचे क्षण आणि भावभावनांची खूप सुंदर गुंफण यामध्ये झाली आहे. ज्योतिबांच्या भूमिकेत संदिप कुळकर्णी यांनी आणि सावित्रीबाईंच्या भूमिकेत राजश्री देशपांडे स्वतः ला पूर्णतः झोकुन दिले आहे. 

ज्योतिबांच्या काळात समाजव्यवस्था अत्यंत कर्मठ होती.  शिक्षणापासून अस्पृश्य कोसो दूर होते. मुलींना तर कोणतेच स्वातंत्र्य नव्हते. अशा परिस्थितीत ज्योतिबांनी  मिशनरी शाळेत शिक्षण घेतले. शिक्षणानेच शोषितांचे भले होऊ शकते हे तरुण वयातच त्यांनी ताडले आणि त्यांनी गोरगरीबांच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. कर्मठ समाजाकडून पदोपदी विरोध, अपमान सहन केला. पत्नी सावित्रीबाई ह्यांना स्वतः शिकवले आणि त्यांच्याही हाती लेखणी देऊन मुलींना शिकविण्याची जबाबदारी टाकली. ज्या काळात मुलींनी शिकणे म्हणजे पाप आणि शिकवणे हे तर महापाप समजले जाई त्या काळात सावित्रीबाईनी ही जबाबदारी खंबीरपणे पेलली. कर्मठ समाजाने फेकून मारलेले च शेण, चिखल, दगडगोटे सहन करत त्यांनी ज्योतिबांना समर्थ साथ दिली. दोघांना घरदार सोडावे लागले पण ते ध्येयापासून मागे हटले नाही.

हे सगळे दाखवत असताना चित्रपट कुठेही रेंगाळत नाही.  दोघांच्या जीवनातील मोजके पण प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारे प्रसंग चित्रपटात दाखवले आहेत. ह्या प्रसंगांशी प्रेक्षक इतके एकरूप होतात की अधून मधुन प्रत्यकाचे डोळे पाणावतात. 

क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांची दमदार एन्ट्री प्रत्येकाला भावली. त्यानंतर प्रत्येक वेळी लहुजी दिसले तेव्हा प्रेक्षकांनी टाळ्या-शिट्या वाजवून दाद दिली. लहूजींचे खंबीरपणे पाठीशी उभे असणे हे ज्योतीबांना हत्तीचे बळ देत होते. चित्रपट बघून आल्यावर प्रेक्षकांना लहुजींचे जीवन चरित्र वाचण्याचा मोह आवरत नाही. सुरेश विश्वकर्मा हे लहुजींच्या भूमिकेत एकदम फिट बसले. असे विश्वकर्मा उस्मान शेख भूमिकेचे श्री तुकाराम बिडकर, दिग्दर्शक श्री निलेश जळमकर सह निर्माता राहुल वानखेडे व अमरावती क्राईम ब्रांचचे निरीक्षक राहुल आठवले यांनीही सायंकाळी 6,15 वाजता अमरावती येथे राजलक्ष्मी येथे हजेरी लावली, या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती.

चित्रपटाला IMDB (9.5/10)आणि इतर सर्व मोठ्या विश्लेषकांनी खूप चांगली रेटिंग दिली आहे.. 

हा चित्रपट मी सहकुटुंब बघायला व आपल्या आवडत्या कलाकार…यांना  आपणही नक्की बघा..       

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: