उच्च शिक्षणासाठी होणारा महागडा खर्च पाहता शैक्षणिक कर्जामुळे इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे, जे आता आपल्या कुटुंबाची सर्व बचत संपुष्टात येण्याची चिंता न करता भारत आणि परदेशात स्वत:चे स्वप्नवत अभ्यासक्रम आणि युनिव्हर्सिटींमध्ये शिक्षण पूर्ण करू शकतात. नवीन फिनटेक व्यासपीठाच्या आगमनाने पालकांच्या पाठिंब्याशिवाय ही शैक्षणिक कर्ज मिळविण्याच्या सुविधा उपलब्ध झाल्याचे इनक्रेड फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक श्री निलांजन चट्टोराज सांगतात.
विद्यार्थी-केंदित दृष्टिकोन:
२००७-२००८ मध्ये विशेष व समर्पित शैक्षणिक कर्ज व्यासपीठांच्या आगमनाने शैक्षणिक कर्ज अर्जांचे मूल्यांकन करण्याचा एक नवीन प्रकार त्वरीत उदयास आला. हे मॉडेल शैक्षणिक गुणवत्तेवर आणि अभ्यासाच्या अपेक्षित प्रोग्रामवर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते, ज्यामुळे पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात कमी झाला; तसेच या कर्जाकरिता पात्र होण्यासाठी तारण जोडण्याची गरज दूर झाली. यामुळे शेकडो हजारो विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाच्या उद्दिष्टांसाठी वेळेवर व परवडणारे वित्तपुरवठा पर्याय उपलब्ध झाले. कालांतराने, परदेशातील डॉलर मूल्यवर्गातील कर्जदारांनी त्यांची उत्पादने भारतीय विद्यार्थ्यांसाठी खुली केली, ही सेवा मर्यादित युनिव्हर्सिटीजसाठी सुरू करण्यात आली.
सह-अर्जदारांची भूमिका: कर्जासाठी सह-अर्जदार किंवा सह-कर्जदार हा सामान्यत: कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक असतो, जो विद्यार्थी कर्जाची परतफेड करण्यामध्ये असमर्थ असल्यास कर्जाची पतरफेड करण्याची जबाबदारी घेतो. बहुतेक कर्जदात्यांना अजूनही कर्जावर अशा सह-अर्जदाराची आवश्यकता आहे, पण विद्यार्थ्याकडे चांगली शैक्षणिक गुणवत्ता असल्यास त्यांच्या आर्थिक पात्रतेला दिलेले वेटेज कमी असते.
पारंपारिक संस्था फक्त सह-अर्जदार म्हणून पालक असण्याचा आग्रह धरू शकतात आणि अन्यथा कर्ज देण्यास टाळाटाळ करू शकतात, पण क्लाउडवरील खासियत म्हणजे इनक्रेड सारख्या आधुनिक फिनटेक कर्जदात्यांना या परिस्थितीबद्दल अधिक माहिती आहे. हे कर्जदाता सुरळीत कर्ज आणि मंजूरी प्रक्रिया सुनिश्चित करते, जे सह-अर्जदाराची पत-योग्यता किंवा पालकांचा अभाव किंवा उत्पन्नाचा स्थिर स्रोत नसलेले पालक अशा गोष्टींना अधिक प्राधान्य देत नाहीत.
शिक्षणाद्वारे प्रदान केलेले मूल्यवर्धन अतुलनीय:
परदेशातील उच्च शिक्षणासाठी फक्त मजबूत शैक्षणिक पार्श्वभूमी, प्रमाणित चाचण्यांमध्ये उच्च गुण आणि उच्च कामगिरी करण्याचा उत्साह आवश्यक नाही, तर महत्त्वपूर्ण आर्थिक कटिबद्धता देखील आवश्यक आहे. जागतिक स्तरावर युनिव्हर्सिटींमधील वाढता खर्च आणि महागाईमुळे खर्चाचा भार उचलताना नियोजित बचत देखील कमी पडू शकते. शैक्षणिक कर्ज ही पोकळी भरून काढण्याचे साधन आहे आणि एखाद्याच्या भविष्यातील गुंतवणूक म्हणून मानले पाहिजे. बहुतेक वेळा ही जीवनाला कलाटणी देणारी व सर्वोत्तम गुंतवणूक ठरू शकते, जी कोणीही करू शकतो.
एखाद्याच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत केल्याने देखील परतफेडीचा भार मोठ्या प्रमाणात कमी होतो. हे एखाद्याच्या आयुष्यभराच्या बचतीला बाधा आणत नाही आणि ईएमआयला मुक्त कालावधीसह सुरू झाल्यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर होण्यासाठी थोडा वेळ मिळतो. हे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे की, शिक्षणाद्वारे प्रदान केलेले मूल्यवर्धन अतुलनीय आहे आणि कोणत्याही व्यक्तीला त्यांचे ध्येय साध्य करण्यापासून रोखू नये. फक्त उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायांची जाणीव असणे आवश्यक आहे.