आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. आजच्याच दिवशी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक सोहळा पार पडला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला आज तिथीनुसार 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे. तर काही इतिहास अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार हे 349 वं वर्ष आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने रायगडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत किल्ले रायगडावर भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. पण हा कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण काही जणांनी तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा करण्याच्या निर्णयावर बोट ठेवलं आहे. तर इतिहास अभ्यासक आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करीत मोठा दावा केला आहे. शिवराज्यभिषेक सोहळ्याचं यावर्षी 350 वं वर्ष नाही तर 349 वं वर्ष आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.
जितेंद्र आव्हाड यांनी पुढे लिहतांना…काय दिवस आले आहेत महाराष्ट्रावर… निवडणुकांसाठी वाट्टेल ते….. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा दिनांक 6 जून, 1674 रोजी झाला. इथे मात्र निवडणूकांचे गणित समोर मांडून राज्याभिषेक साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. शिवराज्याभिषेक दिनाची तारीख जगामध्ये सगळ्यांना माहित आहे ती 6 जून, 1674 आहे. याचाच अर्थ 350 वा शिवराज्याभिषेक दिन हा 6 जून, 2024 रोजी आहे. मग आज आज शिवराज्याभिषेक साजरा करण्याचा विचार कोणाच्या सुपीक डोक्यातून बाहेर पडला. निवडणूकांचे गणित डोळ्यासमोर ठेवून जर असे राजकारण होत असेल तर उभ्या महाराष्ट्राची आज शिवराज्याभिषेक साजरा करणा-यांनी माफी मागावी. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि हिंदू धर्मातील ज्या एका गटाने छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारला व तुम्ही शूद्र आहात असे म्हटलं. तेच आज तिथे जाऊन सांगत आहेत की, सनातन धर्माचे पालन करा.
काय दिवस आले आहेत महाराष्ट्रावर… निवडणुकांसाठी वाट्टेल ते…..
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 2, 2023
छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक हा दिनांक 6 जून, 1674 रोजी झाला. इथे मात्र निवडणूकांचे गणित समोर मांडून राज्याभिषेक साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी शिवराज्याभिषेक झालाच नव्हता. शिवराज्याभिषेक दिनाची तारीख…