Tuesday, December 24, 2024
Homeराज्यरमाई आवास योजनेतील ३ हजार ५४९ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर-समाज कल्याण विभागाचे...

रमाई आवास योजनेतील ३ हजार ५४९ पात्र लाभार्थ्यांना घरकुल मंजूर-समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, शिवानंद मिनगिरे यांची माहिती…

नांदेड – महेंद्र गायकवाड

अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील कुटूंबाना घर, निवारा उपलब्ध करुन देण्यासाठी रमाई आवास घरकुल (शहरी व ग्रामीण) योजना राबविली जाते. या योजनेत सन 2023-24 साठी जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील एकूण 3 हजार 549 बेघर व पात्र लाभार्थ्यांना घरकुलास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त, शिवानंद मिनगिरे यांनी दिली.

सन 2023-24 या मध्ये जिल्ह्यासाठी रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रासाठी प्राप्त उदिष्टांच्या अनुषंगाने सर्व ग्रामपंचायत, गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचेकडून घरकुलासाठी प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्राप्त प्रस्तावांना पालकमंत्री तथा अध्यक्ष रमाई आवास घरकुल योजना जिल्हा निवड समिती, नांदेड यांच्याकडून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे, असे समाज कल्याण कार्यालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: