अमरावती – दुर्वास रोकडे
अमरावती जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिक मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी दि. 30 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त यांनी केले आहे.
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय मुला/मुलींचे शासकिय वसतिगृहात प्रवेशित विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा मोफत पुरविण्यात येतात. सन 2024-25 करीता व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या सर्व विदयार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांनी दि. 31 जुलै 2024 पासून https://hmas.mahait.org या पोर्टल वर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येईल.
चालू वर्ष सन 2024-25 करिता व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्ज पोर्टल वरून डाऊनड करुन त्याची प्रिंट घेवून संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाईन अर्ज सादर करण्यात यावा. तसेच अमरावती जिल्ह्यात महाविद्यालयीन पदवी, पदवीका पदव्युत्तर (व्यावसायिक अभ्यासक्रम) प्रवेशा करीता विभागीय स्तरावरील मागासवर्गीय 1 हजार मुलांकरीता शासकिय वसतिगृह युनिट क्र.१,२,३ निभोंरा,
गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह निंभोरा व संत गाडगे महाराज मुलांचे शासकिय वसतिगृह निभोंरा तसेच मुलीकरीता मागासवर्गीय मुलीचे शासकिय वसतिगृह कॅम्प अमरावती, गुणवंत मुलीचे शासकिय वसतिगृह जेल रोड, अमरावती तसेच विभागीय स्तरावरील 250 मुलीचे युनिट क्र.4, व 125 जयंती मागासवर्गीय मुलीचे (नविन) विलासनगर, अमरावती तसेच तालुकास्तरावरील मुला, मुलीचे शासकिय वसतिगृहामध्ये महाविद्यालयीन पदवी, पदवीका, पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता प्रवेश अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया सुरु आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृहाकडे सादर करावे.