घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सर्वोच्च न्यायालयाच्या प्रारंगणात…
ठाणे – प्रफुल्ल शेवाळे
२६ नोव्हेंबर “संविधान दिनी” भारताचे सर्वोच्च न्यायालय असलेल्या सुप्रीम कोर्टात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु जी यांच्या हस्ते भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. विषेश म्हणजे देशात हा एकमेव पुतळा आहे की तो कोर्ट आवारात उभारण्यात आला आहे.
वकिलीच्या पेहरावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा तीन फूट पायथा आणि सात फूट उंचीचा असून अत्यंत सुरेख पद्धतीने आकारलेला आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा पुतळा उभारला असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भारताचे पहिले कायदा मंत्री आणि संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर सर्वोच्च न्यायालयात पोहोचण्यास ६७ वर्षे लागली.
या पुतळ्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना तयार करण्यात दिलेले अमूल्य योगदान तसेच त्यांची महत्त्वाची भूमिका आपल्या सर्वांना लक्षात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सर्वोच्च न्यायालयात बसवणे हे संवैधानिक न्यायाच्या महत्वाच्या स्थाना कडे टाकलेले पाऊल आहे, ज्यामुळे समाजात न्यायाची भावना वाढीस लागेल.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सर्वोच्च न्यायालय परिसरात स्थापन करण्यात आला आहे.