Sunday, December 22, 2024
Homeराज्यमनपा कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, अडीच लाखांची सोन्याची चैन केली परत...

मनपा कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, अडीच लाखांची सोन्याची चैन केली परत…

नांदेड – महेंद्र गायकवाड

शहरातील वजीराबाद भागात राहणारे विर ठाकुर यांची सोन्याची चैन त्यांच्या मुलाने चुकुन मनपाच्या घंटा गाडीत टाकली . त्या सोन्याच्या चैनची किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये एवढी होती.सदर बाब कुटुंबाच्या लक्षात आल्यानंतर ठाकुर परिवाराने ही बाब मनपाचे क्षेत्रीय कार्यालय क्रमांक चार वजीराबादचे स्वच्छता निरीक्षक संजय जगतकर यांच्याशी संपर्क साधुन झालेली हकिकत सांगितली.

ज्या वाहनात चैन टाकली होती त्या वाहनातून संजय जगतकर आर.अँड.बी इन्फ्रा चे वाहन चालक शिवराज मगरे, कामगार प्रभाकर गोवंदे यांनी घंटा गाडीमधील सोन्याची चैन शोधून संबंधित परिवारास परत मिळवून दिली. परिवाराच्या वतीने तीघांचे आभार मानले. मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम , उपायुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे , क्षेत्रीय अधिकारी संजय जाधव व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी कौतुक केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: