अकोला वाहतुक नियंत्रण शाखेच्या हवालदाराला पैश्याने भरलेले पाकीट आढळून आले होते, तर हवालदाराच्या प्रामाणिकपणाने आढळून आलेले पाकीट परत केल्याने त्या हवालदाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुपेश इंगळे असे या ट्रॅफिक हवालदाराचे नाव असून ते नेहरूपार्क येथील चौकात कर्तव्यावर होते.
आज रोजी अकोला शहरातील नेहरूपार्क चौक येथे ड्युटीवर असणाऱ्या पोलीस अंमलदार सुपेश इंगळे ब क्र 1350 यांना रस्त्यावर एक पॉकेट पडलेले मिळून आले त्यांनी ते शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला येथे जमा केले.
त्या पॉकेट मध्ये ATM कार्ड महत्वाची कागदपत्रे व 7000, रुपये आढळून आले त्या कागदपत्रांवरून त्याचे मालकाचा शोध घेऊन त्यांना त्यांना ते परत करण्यात आले. त्याचे मालक सुमित विश्वनाथ खवळे रा.अकोट फाईल अकोला यांना आपले पॉकेट परत मिळाले म्हणून पोलीस कॉन्स्टेबल सुपेश इंगळे तसेच शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे आभार व्यक्त केले.