सांगली – ज्योती मोरे
धनगर ST आरक्षण अंमलबजावणीसाठी चौंडी येथे सुरु असलेल्या उपोषनात्मक आंदोलनास पाठिंबा आणि सोलापूर येथे जमातीचे कठ्ठर नेतृत्व यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्त सांगली जिल्ह्यातील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे नियोजन बैठक झाली.
या बैठकीमध्ये चौंडी येथील आंदोलनास पाठिंबा जाहीर करुन सोलापूरातील आंदोलनकर्ते मा. शेखर बंगाळे यांना झालेल्या मारहानीचा निषेध व्यक्त करण्यात आला. सोमवारी दिनांक ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सोलापूरातील आंदोलनकर्ते कठ्ठर सामाजिक नेतृत्व सन्माननीय शेखरजी बंगाळे यांचा सांगली जिल्ह्याचे वतीने जाहीर सत्कार करण्याचे नियोजन झाले.
सांगली जिल्ह्यात तालुकानिहाय आणि जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी चौंडी आंदोलनास पाठिंबा म्हणून धनगर जमातीस ST प्रमाणपत्र नाही तर तुम्हास मतदानही नाही. हा नारा घेवून आंदोलनाची वज्रमुठ निर्माण करण्याचे ठरले.
या नियोजन बैठकीस मा. नगरसेवक विष्णु माने, इंजि. अनिल कोळेकर, प्रविण कोकरे, इंजि. शिवाजी शेंडगे, इंजि. सुमित पांढरे, निवृत्त सहा. आयुक्त खरात साहेब, तानाजी दुधाळ, सिद्धाप्पा खांडेकर, डाॅ. राजेंद्र खांडेकर, शिवाजी वाघमोडे, बाळासो गडदे, निवांत कोळेकर आदी उपस्थित होते.