सांगली – ज्योती मोरे
सांगलीत मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी घालून दिलेल्या पत्रकारिता उराशी बाळगून समाज प्रबोधनासह समाज सुधारण्याचे काम अत्यंत सक्षमपणे पार पाडत असलेल्या पत्रकारांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी माननीय जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थातर्फे हुतात्मा स्मारक येथे “सन्मान पत्रकारांचा सन्मान पत्रकारितेचा” सन्मान सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी कार्यक्रमाची सुरवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आली. जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून आयोजित पत्रकार सत्कार सन्मान सोहळ्या बाबतअनेक पत्रकारानी युवा समाजसेविका जयश्रीताई पाटील यांचे भरभरून कौतुक केले.
अनेक पत्रकारांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील संस्थेचे चेअरमन यावेळी म्हणाले आपल्या संस्थेमार्फत आपण सर्व पत्रकारांना एकत्रित करण्याचे काम केले आहे..आपल्या संस्थेचे मनापासून धन्यवाद आपण मला आमंत्रीत केले.हितून पुढे ही कर्मवीर भाऊ राव पाटील पतसंस्था आपला सोबत राहील असे वक्तेवय रावसाहेब पाटील यांनी केले.
तसेच नेहमी समाजात वेगवेगळी उपक्रमाने ओळले जाणारे आमचे मार्गदर्शक पत्रकार शोले स्टाईल दीपक भीमराव चव्हाण यावेळी म्हणाले जयश्रीताई पाटील बहुउद्देश्य सेवाभावी संस्था हे नेहमी सामाजिक क्षेत्रात उत्तीर्ण काम करत आहे. जयश्रीताई पाटील बहुउद्देश्य सेवा संस्थेच्या अध्यक्षाक्षा जयश्रीताई पाटील यांच्यासोबत आम्ही सर्व पत्रकार बंधू-भगिनी आहोतच परंतु तुम्ही या सोहळ्याचे आयोजन करून आम्हला सर्व पत्रकार बंधू,बघीणींना एकत्रित करण्याचे काम केले आहे.
इथून पुढच्या काळात बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेसोबत आम्ही सर्व पत्रकार आहोत अश्या पद्धतीचे मनोगत यावेळेस शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यांनी केले. हा सत्कार सोहळा मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन श्री. रावसाहेब आण्णा पाटील, मालती डेव्हलपरचे सर्वेसर्वा रमाकांत घोडके,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज दादा काटकर,
शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण,जेष्ठ पत्रकार आप्पा पाटणकर,रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी प्रेसिडेंट डॉ.रतन पाटील ,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी,आदी पत्रकार बंधू बघीनी मोठ्या संख्येने उपस्तित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मोहन राजमाने यांनी केले..