Thursday, July 18, 2024
spot_img
HomeSocial Trendingचक्क गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच पोलीस उपायुक्तांना भाजप कार्यकर्त्याकडून धक्काबुक्की...व्हिडिओ व्हायरल…

चक्क गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच पोलीस उपायुक्तांना भाजप कार्यकर्त्याकडून धक्काबुक्की…व्हिडिओ व्हायरल…

शरद नागदेवे, नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात ना जनता सुरक्षित आहे ना पोलीस, काल नागपुरात पोलीस उपायुक्तांना भाजपच्या युवा शहर प्रमुखाकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतांना दिसत आहे. भाजपच्या अश्या गुंडगिरीचा विरोधक चांगलाच समाचार घेतांना दिसत आहे. तर सदर घटनेचा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांच्याकडून ट्विट करण्यात आलाय. हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारं आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत. नागपूरचे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपचे युवा शहराध्यक्ष पुष्कर पोशेट्टीव यांनी धक्काबुक्की केलीय.

संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. उपायुक्त पदाच्या पोलीस अधिकाऱ्याला अशाप्रकारे धक्काबुक्की कशी केली जाऊ शकते? अशी चर्चा सुरु आहे. या घटनेवरुन संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

“हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. मुक्काम पोस्ट : नागपूर, उपमुखयमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देवगिरी निवासस्थान. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजप युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्का बुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता”, असं म्हणत संजय राऊत यांनी व्हिडीओ ट्विट केलाय.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: