प्रतिनिधी, हेमंत जाधव
खामगाव : मर्यादा पुरुषोत्त्तम प्रभु श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव खामगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. शुभ्र वस्त्र व डोक्यावर भगवा फेटा परिधान केलेल्या महिला व पुरूष, उंच आकाशात फडफडणारे भगवे झेंडे,देशभक्ती व धार्मिक गीतांवर डिजेच्या तालावर थिरकणारे युवक व जय श्रीरामाच्या जयघोष करीत दि.30 मार्च गुरुवार रोजी रामनवमी निमित्त शहरातून भव्य शोभा यात्रा निघाली. श्रीरामाची मुर्ती व विहिंप रणरागिणी महिलांचे ढोल ताशा पथक,आदिवासी नृत्य,हनुमान मंडळाचे झाज पथक,बजरंगी डीजे हे शोभा यात्रेचे खास आकर्षन ठरले. ही शोभा यात्रा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुला प्रचंड गर्दी केली होती.
खामगाव शहरात विश्व हिंदु परिषद – बजरंग दल, श्रीराम जन्मोत्सव समिती खामगाव व श्री प्रल्हाद महाराज राम मंदिराच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून भव्य अशा शोभा यात्रेचे आयोजन करण्यात येते. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता येथील सिव्हील लाईन भागातील राम मंदिर येथे जिल्हा संघचालक श्री बाळासाहेब काळे यांचा हस्ते सपत्नीक प्रभू श्रीरामाची विधिवत पूजन होऊन शोभायात्रेला सुरुवात झाली. तर रेखा प्लॉट सतीफैल भागातूनही मिरवणूकीला प्रारंभ झाला. शहरातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत विहिंप रणरागिणी महिलांच्या ढोलताशा पथकात १०० मुलींनी सहभाग घेतला होता.
तर मिरवणुकीच्या अग्रस्थांनी श्री प्रल्हाद महाराज मंदिर येथून सुरुवात झालेल्या शोभायात्रा होती. यामध्ये विविध गावातून आलेल्या दिंड्या त्यामागे ढोलपथक, पताकाधारी, श्रीरामरथ,पालखी व त्यापाठोपाठ रेखा प्लॉट सतीपैâल भागातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा होती.शुभ्र वस्त्र व डोक्यावर भगवा फेटा परिधान केलेल्या असंख्य महिला व पुरूष, उंच आकाशात फडफडणारे भगवे झेंडे, डिजेच्या निनादावर थिरकणारे युवक व जय श्रीरामाच्या जय घोषाने अवघे खामगावा शहर अक्षरशा दुमदुमून गेले होते. या मिरवणुकीत शोभायात्रा मार्गावर सामाजिक संघटना, हिंदुत्ववादी संघटना, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सुध्दा सहभागी झाले होते.विविध चौका चौकात हिंदुत्ववादी संघटना, मंडळे ,शहरातील शाळा यांचा कडून श्रीराम प्रभू चा जीवनातील विविध प्रसंगावर झाक्या सादर करून स्वागत करण्यात आले ,अनेक चौकात मिरवणूकीत सहभागी नागरिकांना थंड पाण्याची,मठ्ठा, आईस्क्रीम,फराळाची व्यवस्था नागरिकांकडून करण्यात आली होती. मिरवणुकी दरम्यान कुठलीही अनुचित घटना होवू नये, यासाठी शहर पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
मंगळवारी शहरातून निघालेल्या शोभायात्रेमध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता. शहरातील सर्व रस्ते भगवे झाल्याचे दिसून आले. आतापर्यंतचा सर्व रेकॉर्ड तोडीत यावर्षाची शोभायात्रा रेकार्ड ब्रेक व ऐतिहासिक ठरली. श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने गुडीपाडवा दि.२२मार्च ते ३० मार्च श्रीरामनवमी असा उत्सव साजरा करण्यात आला. यादरम्यान विविध स्पर्धा,धार्मिक कार्यक्रम,सकाळ संध्याकाळ विविध समाज बंधूंच्या हस्ते समरसता आरती घेण्यात येवून गुरुवार ३० मार्च रोजी शोभायात्रेने या उत्सवाचा श्री संत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम येथे समारोप झाला.श्रीराम जन्मोत्सव व शोभायात्रा यशस्वी करण्या साठी विहिंप बजरंग दल श्रीराम जन्मोत्सव समिती श्री प्रल्हाद महाराज राम मंदिर चा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मातृशक्ती यांनी अथक परिश्रम घेतले