मुर्तिजापूर – देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवी मुर्तिजापूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सतिश अग्रवाल यांच्या परंपरागत दमनी व छकडयाने शहरात महारॅली काढून स्वातंत्र्याच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे.
आपल्याला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाले असून या चळवळीत देशाच्या अनेक हुताम्त्यांनी प्राणाची बाजी लावली,1947 साली देश जेव्हा स्वातंत्र्य झाला त्यावेळी कशी परिस्थिती असणार आणि भारतीयांनी कसा जल्लोष साजरा केला असणार, त्या जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी, अमृत महोत्सवानिमीत्य मुर्तिजापूर शहरात विविध रॅली चे सत्र सुरू असून १३ आगस्ट शनिवार रोजी जयस्तंभापासून बैल दमणी, छकडा व रेंगी या परंपरागत असलेल्या वाहनांच्या सहभागाने ही महारॅली मुर्तिजापूर नगरी साठी आगळीवेगळी ठरली. उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते यांनी नारळ फोडून रॅली चा शुभारंभ केला.
यावेळी या वेळी उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते पाटील यांच्या सह तहसीलदार प्रदीप पवार नगरपरिषद मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे सामाजिक वनीकरण विभाग अधिकारी संगीता कोकणे आयोजक संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान मुर्तीजापुर प्रमुख सतीश अग्रवाल भाजपा तालुकाध्यक्ष भुषण कोकाटे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप देशमुख सुरेशराव तायडे राजेंद्र समाधान भटकर ,दिगंबर भूगोल ,समाधान इंगळे व्दारकाप्रसाद दुबे, इब्राहिम घाणीवाले,रवि राठी, सादिक शा निलेश मुळे सरपंच सुमित राऊत उपसरपंच जमील उर्फ जम्मू भाई , वानखडे, मोहम्मद अझर वासुदेव डहाळे इमरान अली ,अशोक इंगळे, सदाशिव शेळके मुख्याध्यापक, मो. फहीमोद्दीन, मो. नासिर हुसैन, नियाज़ उल्लाह, मो. याकूब, परवेज़ इक़बाल, उबैद चाऊस, रेहान अहमद, मो. ज़हीरोद्दीन, अथर जमील, अकील अहमद खान, अब्दुल यासीन, इत्यादी मान्यवर उपस्थित होते नॅशनल उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अनवर खान केले
स्टेशन विभाग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक भगतसिंग चौक, जूनी वस्ती, महाराज चौक टांगा चौक ,स्वामी समर्थ मंदिर इ. मार्गक्रमण करीत शहराला फेरी मारून जनजागृती करीत नॅशनल उर्दू शाळेत महारॅली चार समारोप करण्यात आला.
देशप्रेम व मानवतावादी दृष्टिकोन नसानसात भरलेल्या गाडगेबाबा स्वच्छता अभियान व शाकंभरी प्रतीष्ठान चे अध्यक्ष सतिश अग्रवाल यांनी खास संग्रहीत ठेवलेल्या महाराष्ट्राच्या तत्कालीन वैभवाची साक्ष देणाऱ्या” दमनी ” व ”छकड” (रेंगी), गण १५ दिवसांपासून तिरंग्याचा रंग व भारतमातेची प्रतिकृती साकारण्याची मेहनत घेत आज जवळपास लुप्त झालेली ऐतिहासिक रूढी परंपरा असलेल्या वाहनाची उमलत्या पीढीस ओळख रहावी म्हणून बैलजोडीसह सहभागी केले. व ते बहुसंख्यांचे आकर्षण ठरले.