हेमंत जाधव
भाविक भक्तांनी- महिला भगिनींनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा – ॲड. आकाश फुंडकर, आमदार तथा अध्यक्ष श्री भोजने महाराज संस्थान श्री क्षेत्र अटाळी. दि.13 नोव्हेबर 2023 रोजी दरवर्षी प्रमाणे परमपुज्य़नीय श्री संत भोजने महाराज पुण्य़तिथी सोहळ्याला मोठया थाटात सुरुवात झाली.
या पुण्य़तिथी सप्ताह सोहळयाचा सोमवार दि.20 नोव्हेंबर 2023 रोजी सांगता होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त़ महिला भगिनींनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगांव विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार तथा अध्यक्ष, श्री संत भोजने महाराज संस्थान, अटाळी यांनी केले आहे.
श्री क्षेत्र अटाळी येथे परमपुज्य़ श्री भोजने महाराज संस्थान येथे मागील 3 दशकापासून दिवाळीच्या दिवशी पासून पुण्य़तिथी सोहळ्यास सुरुवात होते. या पुण्य़तिथी सोहळ्यास महाराष्ट्र भरातील नामवंत किर्तनकार आपल्या मधूर वाणीतून किर्तन सादर करतात. या किर्तनाचा लाभ पंचक्रोशीतील भविक भक्त़ महिला भगिनींनी दरवर्षी घेतात. या किर्तनातून समाज प्रबोधनाचे काम केले जाते. जीवन जगण्याचा मंत्र दिला जातो.
सोमवार दि.20 नोव्हेंबर 2023 रोजी श्री संत भोजने महाराज संस्थान अटाळी येथे सकाळी रामायणाचार्य ह.भ.प.श्री संजय महाराज पाचपोर यांच्या काल्याचे किर्तन होणार असून काल्याच्या किर्तनानंतर लगेच महाप्रसादास सुरवात होणार आहे. तरी श्री संत भोजने महाराज भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा श्री संत भोजने महाराज संस्थानचे अध्यक्ष, ॲड श्री आकाश फुंडकर यांनी केले आहे.