Saturday, November 16, 2024
HomeSocial Trendingहिरोगिरी अंगलट आली…रील बनवताना मालगाडीला डोकं आदळलं…Viral Video

हिरोगिरी अंगलट आली…रील बनवताना मालगाडीला डोकं आदळलं…Viral Video

Viral Video : रेल्वे रुळावर रील बनविणे किती धोकादायक आहे याच उदाहरण या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी, लोक आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर रील बनवतात हे अत्यंत धोकादायक असून सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त लाईक मिळविण्यासाठी कोणताही धोका पत्करतात.

असे धोकादायक रील्स बनवणे थांबवण्यासाठी रेल्वेने अनेकवेळा जनजागृती मोहीमही राबवली, पण लोक याला दुर्लक्षित करतात. गेल्या दोन तीन दिवसापासून पुन्हा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला घाबरवेल.

या व्हिडिओत दिसत आहे की, तिघांना रील बनवण्याचा एवढा ध्यास आहे की सर्वजण आपला जीव धोक्यात घालण्यास मागेपुढे पाहत नाहीत. या व्हिडिओमध्ये तीन जण रेल्वे ट्रॅकवर उभे राहून आरडाओरडा करत आहेत. त्यात दोन मुले दिसत आहेत, त्यापैकी एकाच्या हातात काचेची बाटली आहे. त्याचवेळी आणखी एक मूल रुळावर ट्रेनची वाट पाहत असल्याचे दिसते.

तेवढ्यात त्या रुळावर एक ट्रेन येते, त्यानंतर दोन मुलं रुळावरून खाली उतरतात आणि ट्रेन पाहून बाटली दाखवताना ओरडताना दिसतात. त्याचवेळी तिसरा व्यक्ती ट्रेनच्या अगदी जवळ आल्यानंतर रुळावरून खाली उतरतो.

हा तिसरा माणूस रील बनवण्याच्या नशेत असला तरी त्याला वेगात जाणाऱ्या ट्रेनच्या अगदी जवळून व्हिडिओ शूट करायचा आहे. त्यानंतर अचानक ट्रेनने त्याच्या डोक्याला जोरदार धडक दिली आणि ती व्यक्ती सरळ जमिनीवर पडली.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जिथे हे लोक रील बनवत आहेत, तिथे इतरही अनेक मुले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये रील बनवताना ट्रेनच्या धडकेने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अनेक वेळा चालत्या ट्रेनला लटकून रिले बनवताना विजेच्या खांबाला धडकून मृत्यूही झाले आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे सांगणे कठीण असून अनेकांच्या मते हा दोन वर्षापूर्वीचा असल्याचे समजते.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: