इराण हिजाब विरोध : इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर, हिजाबविरोधातील आंदोलन सुरूच असून आजरोजी चौथ्या आठवड्यात प्रवेश केला आहे, आंदोलन ज्या गतीने सुरू झाले त्याच गतीने पुढे जात आहे. या प्रदर्शनाला जगातील इतर देशांचाही पाठिंबा मिळत आहे. सरकारने लाठ्या-काठ्याचा वापर सोबतच गोळ्याही झाडल्या, मात्र महिलांनी निदर्शनातून एक पाऊलही मागे हटले नाही. त्यांच्यावर जेवढी कडक कारवाई केली जात आहे, तेवढीच त्या जोमाने निदर्शने करीत आहे.
या आंदोलनात आतापर्यंत १८५ लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा मानवाधिकार आयोगानं केला आहे. या हिंसक संघर्षात 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यासह दोन हजारांहून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, इराण सरकारने यासंबंधी कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. त्याच वेळी, मानवाधिकार आयोगाच्या मते, मारले गेलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या लोकांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे. निदर्शनादरम्यान महिला हिजाब जाळत आहेत. इराणच्या ग्रीन मूव्हमेंट 2009 पासून, या निदर्शनांद्वारे, इराणच्या धर्मशाहीसमोर सर्वात मोठे आव्हान उभे केले गेले आहे.
महिलांचा सहभाग
इराणमधील तरुण पिढीला स्वातंत्र्याची गरज आहे. त्यांना मुक्तपणे जगायचे आहे. त्यामुळे इराणच्या इस्लामिक रिपब्लिकमध्ये सामाजिक, राजकीय किंवा सांस्कृतिकदृष्ट्या त्यांना त्यांचे भविष्य दिसत नाही. या महिलांना त्यांचे आई-वडील आणि आजी-आजोबांप्रमाणे मुक्तपणे जगायचे आहे. या आंदोलनात मारले गेलेल्या शकरामी आणि इस्माइलजादेह यांनी तरुण पिढीला हसायला आणि कल्पनाशील व्हायला शिकवलं. त्यांनी देशात सामाजिक मूल्ये रुजवली. सोबतच शकरामी आणि इस्माईलजादेह यांनी लोकांना वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचे आणि वागण्याचे धैर्य दिले.
निषेध मोर्चाच्या समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये , महिला आंदोलकांना सुरक्षा दलांनी मारहाण केली आणि ढकलले. यामध्ये हिजाब उतरवलेल्या महिलांचा समावेश आहे. इराणमध्ये हिजाब घालणे अनिवार्य आहे. अधिकार्यांनी इंटरनेट अवरोधित करूनही राजधानी तेहरान आणि इतर ठिकाणचे व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित होत आहेत. सोमवारी एका व्हिडिओमध्ये विद्यापीठ आणि हायस्कूलचे विद्यार्थी निदर्शने करताना आणि घोषणाबाजी करताना दिसले. काही महिला आणि मुली डोके न झाकता रस्त्यावर उतरताना दिसल्या.
इराणी सैन्याने
कुर्दिशमध्ये कारवाई तीव्र केली सरकारी सैन्याने मंगळवारी इराणमधील निदर्शने शांत करण्यासाठी देशातील कुर्दीश प्रदेशांमध्ये त्यांची कारवाई तीव्र केली. इराणच्या कुर्दिस्तान प्रांताची राजधानी सनंदजमध्ये दंगलविरोधी पोलिसांनी गोळीबार केला. त्याच वेळी, ऍम्नेस्टी इंटरनॅशनल आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराने महसा अमिनीच्या मृत्यूच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या लोकांना लक्ष्य केल्याबद्दल इराणचा निषेध केला आहे. दरम्यान, तेल कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या काही लोकांनीही सोमवारी दोन मोठ्या रिफायनरी संकुलात आंदोलन केले.
इराणचे माजी राष्ट्रपती अकबर हाश्मी रफसंजानी यांच्या मुलीला
महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या निदर्शनेदरम्यान तेहरानमध्ये गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. फैझेह हाश्मी, 59, माजी आमदार आणि महिला हक्क कार्यकर्त्या, यांना 27 सप्टेंबर रोजी राजधानी तेहरानमधील रहिवाशांना निदर्शनांमध्ये भाग घेण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.