Saturday, December 28, 2024
Homeराज्यनांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथी होणार पोलीस; उच्चशिक्षित दिनेश हणवंतेचा पोलीस भरतीसाठी मराठवाड्यातील पहिला...

नांदेड जिल्ह्यातील तृतीयपंथी होणार पोलीस; उच्चशिक्षित दिनेश हणवंतेचा पोलीस भरतीसाठी मराठवाड्यातील पहिला अर्ज…

नांदेड – महेंद्र गायकवाड

मा.उच्च न्यायालय, बॉम्बे यांनी तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पोलीस भरतीत पर्याय उपलब्ध करुन देण्याबाबत दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या सुनावणीमध्ये आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पोलीस भरती मध्ये policerecruitment२०२२.mahait.org या संकेतस्थळावर तृतीयपंथातील व्यक्तीसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. सदरचा पर्याय पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक या पदासाठी दिनांक १३ डिसेंबर २०२२ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

नांदेड जिल्ह्यात तृतीयपंथीयासाठी काम करणारे कमल फॉउंडेशनचे अमरदीप गोधणे यांच्याकडे एका तृतीय पंतियाने पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची इच्छा व्यक्त करताच अमरदीप गोधणे यांनी उच्चशिक्षित असलेल्या दिनेश हणवंते याचा अर्ज भरला आहे. हा मराठवाडयातील व नांदेड जिल्ह्यातील पहिला तृतीयपंथी असल्याचे समजते.

महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार सामाजिक वातावरणातून बहिष्कृत समजल्या जाणाऱ्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारने पोलिस भर्ती प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी सामाजिक आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शेवटच्या दिवशी देश सेवेची आवड आसलेल्या नांदेड शहरातील उच्च शिक्षित असलेल्या व सध्या एम.पी. एस.सी. परीक्षेची ची तयारी करणाऱ्या दिनेश हणवंते याला राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळताच त्यांनी त्यांची मनातील इच्छा व्यक्त केली.

मात्र तृतीयपंथीनचे प्रमाणपत्र नसल्याने त्याचे अर्ज भरण्याचे टाळल्या जात होते मात्र पोलीस होण्याची भरण्याची जिद्द असल्याने या प्रमाणपत्रा साठी शेवटचा दिवस असल्याने तृतीयपंथानवर काम करणार्‍या कमल फाउंडेशन ने त्याला फॉर्म भरण्यासाठी लागणाऱ्या सर्वच कागद पत्राची पूर्तता करत अखेर शेवटच्या दिवशी सायंकाळी त्याचा पोलिस भर्ती साठीचा अर्ज भरून घेतला असून हा मराठवाड्यातील पहिल्याच तुतीयपंथीयाचा पोलिस भर्तीचा अर्ज आसल्याचा त्यांच्या कडून सांगण्यात आलं. समाजात एकीकडे तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टिकोन जरी वेगळा असला तरी कमल फाउंडेशन मात्र तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: