अंजनगावसुर्जी (ता.23)
महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास मंत्रालयाच्या वतीने ०२ सप्टेंबर रोजी प्रशासकीय कारणास्तव येथील मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांची बदली किनवट जिल्हा नांदेड येथे करण्यात आली होती आणि त्यांना कार्यमुक्त करून पदस्थापनेच्या ठिकाणी ०३ सप्टेंबर ला रुजू होण्याचे आदेश प्राप्त झाले होते परंतु ही बदली मान्य नसल्याने मुख्याधिकारी डोल्हारकर यांनी ‘मॅट’ न्यायिक प्राधिकरणाकडे दाद मागण्याकरिता दावा दाखल केला असता त्यांना ०५ सप्टेंबर ला पुढील आदेशा पर्यंत ज्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत त्याच ठिकाणी कामकाज करण्याचा जैसे थे आदेश मिळाला होता.
मॅटच्या जैसे थे आदेशाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असता न्यायालयाने त्यांच्या बदलीवर कायम स्थगिती दिली आहे. याचिका कर्त्याच्या वतीने ॲड.तुषार ताथोड यांनी काम पाहिले तर शासनाच्या वतीने ॲड.पल्लवी बावनकुळे यांनी बाजू मांडली. मुख्याधिकारी डोल्हारकर यांच्या बदलीवर उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने स्थगिती दिल्यामुळे ते नगरपरिषद अंजनगाव सुर्जी येथेच कार्यरत राहणार असल्याचे समजले आहे.