Thursday, September 19, 2024
Homeराज्यडंम्परच्या धडकेने चिरनेर जवळ हेटवणे पाईप लाईन फुटली….लाखो लिटर पाणी वाया

डंम्परच्या धडकेने चिरनेर जवळ हेटवणे पाईप लाईन फुटली….लाखो लिटर पाणी वाया

कोकण – किरण बाथम

नवीमुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हेटवणे धरणातील पाईप लाईनला चिरनेर गावा जवळील रस्त्यावरून जाणाऱ्या भरधाव वेगातील डंम्परने धडक दिल्याने पाईप लाईन फुटण्याची घटना घडली आहे. सदर अपघात हा मंगळवारी ( दि१०) सकाळी ठिक १०-१५ च्या सुमारास घडला असून पाईप लाईन मधून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच सिडको पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबई, खारघर, उरण येथील रहिवाशांना पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून चिरनेर – गव्हाण फाटा रस्त्यालगत सुमारे दिड मिटर व्यासाची पाईप लाईन टाकण्यात आलेली आहे.

या पाईप लाईन मधून मोठ्या दाबाने पाणी पुरवठा होत असतो.मंगळवारी ( दि१०) सकाळी ठिक १०-१५ च्या सुमारास चिरनेर गावा जवळील रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या डंम्परची धडक सदर पाईप लाईला बसली असता पाईप लाईन मधून पाण्याचे फवारे उंचच उंच उडत होते.

सदर अपघात हा चिरनेर गावा जवळील माकड डोरा आदिवासी वाडी जवळ झाला आहे.रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरीकांनी सदर घटनेची माहिती सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आहे.तसेच पाईप लाईन मधून सुरु असणारा पाणी पुरवठा बंद केला आहे. अशी माहिती सिडको पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: