देवलापार भागातील घोटी (रमजान) सालई, दाहोदा यांचेसह इतर गावे प्रभावीत…
रामटेक – राजु कापसे
रामटेक दिनांक 3 आक्टोंबर ला दुपारच्या सुमारास तालुक्याच्या देवलापार आदिवासीबहुल भागातील घोटी रमजान सालाई , दाहोदा यांचेसह इतर काही गावे प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसामुळे प्रभावित झाले या परिसरात असलेल्या शेतामधील उभे पिके अक्षरशः झोपली परिणाम स्वरूप शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ऊन तापत आहे त्यामुळे उकाडा खूप वाढलेला आहे. तेव्हा अशा वातावरणात पावसासह वादळी वाऱ्याची तीळमात्रही शाश्वती शेतकऱ्यांना वाटत नसावी. ते आपल्या शेतातील उभे पीक पाहून नाना तऱ्हेचे स्वप्न पाहण्यात गुंग होते आलेल्या पैशांमध्ये गहाण ठेवलेले सोने सोडवायचे आहे.
मुलीचे लग्न उभे करायचे आहे कोणाचे उसनवार घेतलेले पैसे परत करायचे आहे तथा आपला संसार गाडा चालवायचा आहे अशा विविध बाबी यावेळी शेतकऱ्यांसमोर असणार मात्र त्यांच्या या सर्व स्वप्नांवर आज तीन ऑक्टोंबर ला दुपारच्या सुमारास पाणी फेरले.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली शेतात जाऊन पाहिले असता शेतकऱ्यांना आपले उभे पिक झोपलेले दिसले सध्या शेतकऱ्यांच्या शेतात विशेषता पऱ्हाटी ( कापुस ), धान तथा तुर अशा प्रकारची शेतपिके उभी होती सोबतच काही शेतकरी मारगण ( भाजीपाला ) काढणारे होते त्यामुळे आजच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे या सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले तेव्हा शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल यात शंका नाही.
वादळी वारा एवढा भयंकर होता की रस्त्याच्या कडेला असलेली झाडे सुद्धा कोसळून पडली होती. तेव्हा शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.