पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे याचं मतदार संघात पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत आक्रमक रूप पाहायला मिळाल तसेच कर्तव्यास दिरंगाई करीत असलेल्या अकोला तहसीलदार सुनील पाटील यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई तसेच गावांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मूर्तिजापूर तालुका व बार्शीटाकळी तालुक्यात अतोनात नुकसान केले आहे. या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन पावसाने खरडून गेली आहे. अनके गावामध्ये पुराचे पाणी घुसल्याने नागरिकांनी जीव मुठीत घेवून सुरक्षित स्थळी दाखल झाले होते. यामध्ये बऱ्याच घरांची पडझडही झाली. अश्यातच नागरिकांना दिलासा देण्यासाठी मूर्तिजापूर,बार्शीटाकळी तालुक्याची प्रशासकीय टीम रात्री दोन वाजता पासून काम करीत आहे मात्र अकोल्याचे तहसीलदार हे आपल्या कामात दिरंगाई करीत असल्याचा आरोप आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात केला आहे.
आमदार हरीश पिंपळे यांनी सभागृहात आक्रमक पवित्र घेत म्हणाले, तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सर्कल मध्ये डाळिंबी कोळंबी मोझरी आणि खराब ढोरे लसणापूर, पाय टांगी आणि बार्शीटाकळी तालुक्यात अनेक गावे पाण्याखाली आलेले आहेत, कालपासून सारे लोक आपल्या जीव मुठीत घेऊन बसले आहेत. मतदार संघातील दोन्ही प्रशासनाचे तहसीलदार रात्री दोन वाजतापासून काम करीत आहेत. अकोला तालुक्यातील तहसीलदार यांना मी सकाळी सहा वाजता पासून फोन केला, त्यांनी सांगितलं प्राथमिक अंदाज येवू द्या, ते अकरा वाजेपर्यंत गावात पोहोचले नसल्यामुळे गावकऱ्यांनी मुंबई-कलकत्ता महामार्ग अडविला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पिंपळगाव चांभार याचा भिंत फुटली जर आज पाऊस नाही थांबला तर किती लोकांचे सांगता येत नाही आणि हे तहसीलदार शासनाने बदनाम करण्याचं काम करून राहिले मतदारसंघात पण दोन तहसीलदार रात्री दोन वाजता अजून काम करून राहिले पण पाटील सुनील पाटील नाही त्यामुळे लोक चिडले आहेत.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्याच्या तहसीदार सुनील पाटील यांच्यावर कारवाई तसेच गावांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.