निशांत गवई,पातुर
पातूर : गेल्या काही दिवस शांत असलेल्या निसर्गाने आज पुन्हा आपले डोके वर काढले असून दुपारी चार वाजता पासून गारपीट सह वादळीवाऱ्या सोबतच जोरदार पाऊसाची सुरुवात झाल्याने शेतकरी राजा पुन्हा संकटात सापडला आहे.
सविस्तर वृत्त असे कि गेल्या काही दिवस शांत असलेल्या निसर्गाने आज पुन्हा आपला रंग दाखवून खामखेड, भंडारज खु. भंडारज बु. या भागात गारपीट वादळीवाऱ्या सह शेतकऱ्या शेतातील पिकाचे नुकसान झाले असून खामखेड येथील जिल्हा परिषद शाळे मधील पिंपळच्या झाडावर विज कोसळी असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून भंडारज खुर्द व भंडारज बू येथे अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्याने काही नागरिकांच्या घरावरील टीनपत्रे उडाली असून उन्हाळी कांदा निंबू मूंग भुईमुग तीळ ज्वारी भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी कांदा उपटून सुकण्यासाठी त्याचे पगर घातले असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शेतकरी हा नुकसान भरपाई च्या प्रतीक्षेत आहे