अकोला – अमोल साबळे
अकोला जिल्ह्यातील अतिदृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर या अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीची व पीकविमा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळाली नसून शेतकऱ्यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून शेतकरी अद्यापही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
संबंधित पीक विमा कंपनीच्या या कारभारावर शेतकरी वर्गाकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील वर्षी सतत पाऊस सुरू असल्याने तूर, सोयाबीन, कपाशी, सोयाबीन, उडीद व मूग पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने लागडव केली होती. त्यात अति पावसामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी असताना पिकाचे अतोनात नुकसान झाले.
देखील अद्यापही कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई व पीक विमा धारक शेतकºयांना मिळालेली नाही. तसेच अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेले असताना देखील पीक विमा धारक शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असून शासनाने पीक विमा संबंधित कंपन्यांना याबाबत सखोल माहितीची चौकशी करावी व अतिदृष्टी व पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे अशी मागणी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे.
मागील वर्षी अतिदृष्टीमुळे पिकाचे अतोनात नुकसान होऊन सुद्धा पिक विमा व अतिदृष्टी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी नुकसान होऊन सुद्धा नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी वर्ग मधे प्रश्न निर्माण झाला आहे. महेश चव्हाण ,निंबा फाटा, शेतकरी