कोल्हापूर प्रतिनिधी-राजेंद्र ढाले
येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी अथायू हॉस्पिटल येथे सर्वसमावेशक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा योजने अंतर्गत राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक सारंगल सर पोलीस पुणे विभागाच्या महामार्ग पोलीस अधीक्षक लता फड, प्रितम यावलकर व महामार्ग पोलीस निरीक्षक शिंत्रे मॅडम कोल्हापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूरमहामार्ग पोलीस मदत केंद्र उजळईवाडी पो.अधिकारी व पो अंमलदार यांचे प्रयत्नाने सदर आयोजित करण्यात आले होते
सदर शिबिरा मध्ये अथायू हॉस्पिटल कोल्हापूर चेअरमन डॉ अनंत सरनाईक, सि ई ओ डॉ मयूर शिंदे, रवी कुमार, रोहन सुरवंशी यांनी आरोग्य शिबीर मध्ये पो. अधिकारी, पो.अंमलदार, होमगार्ड, हायवे हेल्प लाईन चे कर्मचारी, नागरिक, वाहन चालक असे एकूण ७०ते ८० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.